देशातील अनेक राज्यांमध्ये आधार कार्ड,पॅन कार्ड, पासपोर्ट आणि रेशन कार्ड साठी कोविडलसीकरण प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
.जरउत्तर प्रदेश राज्यातील गाजियाबाद येथील विचार केला तर गाजियाबाद मध्ये परिवहन कार्यालयातील ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किंवा त्याचे रिनीवल करण्यासाठी कोविड लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
गाजियाबाद मध्ये ज्या भागांमध्ये बांधकामे सुरू आहेत त्यांना आता अशाच प्रकारचे आदेश दिले जात आहेत. ज्या बांधकाम साइटवर मजूर काम करत आहेत तेथे काम करणाऱ्या प्रत्येक मजुरांना लस लावण्याच्या सक्तसूचना देण्यात आले आहेत.
आता गाझियाबादमधील सर्व बांधकाम साईटवरच्या प्रभारी न शपथपत्र द्यावे लागेल की तेथे काम करणाऱ्या सर्व मजुरांना कोविडची लस देण्यात आली आहे. तसेच देशातील अन्य राज्यांमध्ये दुकानदार, ऑटोचालक तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांवर वस्तू विकणाऱ्या साठी अशी अट घालण्यात आली आहे. कोरोना ची लस घेतल्याशिवाय आपले काम पुन्हा सुरू करू शकत नाही. गुजरात राज्याने देखील असेच आदेश जारी केले आहेत.
गुजरात मधील 18 शहरातील व्यावसायिक संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना 30 जून पर्यंत लसीकरण करण्यास सांगितले होते तसेच इतर शहरे आणि जिल्ह्यांमध्येही दहा जुलै ची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. तसे न झाल्यास अशा संस्था बंद करण्यात येतील असे शासन आदेशात म्हटले होते.
( संदर्भ-tv9 मराठी)
Published on: 06 November 2021, 09:10 IST