News

खान्देश समवेतच राज्यातील अनेक विभागातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यावर्षी कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आहे. कापसाला मिळत असलेल्या बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा (cotton growers) आनंद गगनात मावत नाहीय. तसेच कापसाच्या भावात अजूनही घसघशीत वाढ होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे कापसाची आवक कमालीची मंदावल्याचे चित्र बाजारपेठेत (In the market) दिसत आहे. मात्र असे असले तरी, कापसाचे भाव वाढतील की कमी होतील हे सर्वस्वी मायबाप सरकारवरच अवलंबून आहे.

Updated on 21 January, 2022 6:34 PM IST

खान्देश समवेतच राज्यातील अनेक विभागातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यावर्षी कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला आहे. कापसाला मिळत असलेल्या बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा (cotton growers) आनंद गगनात मावत नाहीय. तसेच कापसाच्या भावात अजूनही घसघशीत वाढ होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे कापसाची आवक कमालीची मंदावल्याचे चित्र बाजारपेठेत (In the market) दिसत आहे. मात्र असे असले तरी, कापसाचे भाव वाढतील की कमी होतील हे सर्वस्वी मायबाप सरकारवरच अवलंबून आहे.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कापसाच्या गाठीवर सरकारने जर आयात शुल्क माफ केली तर कापसाची मोठ्या प्रमाणात आयात होऊ शकते आणि त्यामुळे स्थानिक बाजारातील कापसाची मागणी घटू शकते आणि सहाजिकच त्यामुळे बाजारभावात कमालीची घसरण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातच निर्णय घेण्यासाठी 31 जानेवारीला कापूस व्यापारी व केंद्र सरकार यांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. हाती आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार 31 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण मुद्दा हा कापसाच्या आयात शुल्क संदर्भातच असणार आहे. त्यामुळे आता कापसाचे भाव परत एकदा गगनाला भिडतील की कमालीचे घसरतील हे सर्व केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून असेल. यावर्षी संपूर्ण देशात कापसाच्या उत्पादनात कमालीची घट नोंदविण्यात आली आहे, हाती आलेल्या आकडेवारीनुसार चाळीस ते पन्नास लाख कापसाच्या गाठीची घट यावर्षी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत असलेल्या स्थानिक बाजारपेठेत कापसाला मोठी मागणी आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने कापूस चांगलाच भाव खाताना दिसत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोक (Knowledgeable people in the field of agriculture) कापसाचे भाव अजून लक्षणीय वाढू शकतील अशी आशा व्यक्त करत आहेत. सध्या संपूर्ण देशात कापसाचे दर दहा हजार रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. राज्यात सर्वत्र 9500 ते 9600 रुपये प्रति क्‍विंटल दराने कापूस खरेदी केला जात आहे.

यावर्षी संपूर्ण खानदेशात (In Khandesh) 7 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. या एवढ्या मोठ्या क्षेत्रातून आतापर्यंत जवळपास 16 लाख गाठींची खरेदी होणे अपेक्षित होते, मात्र कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने अद्याप पर्यंत केवळ सात लाख गाठींची खरेदी झाली आहे. मागच्या वर्षी देखील जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत बारा लाख गाठींची विक्रमी खरेदी केली गेली होती. त्यामुळे खानदेशात जवळपास चार लाख गाठींची घट झाली असेल असा अंदाज कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्ती यांनी व्यक्त केला आहे. भारतात कापसाला दहा हजारापर्यंत विक्रमी बाजार भाव प्राप्त होत आहे, तसेच सध्या सूतगिरणीने साठी कापसाची मोठी मागणी आहे त्यामुळे हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसावर आकारले जाणारे आयात शुल्क हटवण्याची मागणी सूतगिरणी चालकांकडून यावेळी करण्यात येत आहे. 

आयात शुल्क कमी झाले तर बाहेरून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात होईल आणि परिणामी कापसाचे दर कमालीचे घसरतील. मात्र जर मायबाप सरकारने कापसावर आकारला जाणारा आयात शुल्क कायम ठेवला तर कापसाचे बाजार भाव अजूनही वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कापसाचे बाजारभाव ठरवण्यासाठी मायबाप सरकार प्रमुख सूत्रधार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: cottons rate will increase or decreased is all dependent on government
Published on: 21 January 2022, 06:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)