News

बाजारात एखाद्या गोष्टीचा मागणीप्रमाणे जर पुरवठा होत नसेल तर त्या वस्तूला चांगला बाजारभाव प्राप्त होत असतो. बाजारपेठेचे हेच गणित कापसाबाबत तंतोतंत खरे ठरत आहे. यावर्षी खानदेश समवेतच राज्यातील इतर भागात कापसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट नमूद करण्यात आली होती. कापसाच्या क्षेत्रात घट झाली आणि त्यामुळे सहाजिकच उत्पादनात देखील मोठी घट घडल्याचे चित्र आपणास दिसत आहे. उत्पादनात घट घडली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी वधारली त्यामुळेच की काय? यावर्षी कधी नव्हे ते कापसाला तब्बल दहा हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव प्राप्त झाला. कापसाच्या बाजार भावात अजूनही वृद्धी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सोन्यासारखा कापूस साठवणूक करून ठेवला आहे.

Updated on 16 January, 2022 2:16 PM IST

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक आपले मत व्यक्त करताना सांगताहेत की, आगामी एक महिन्याच्या कालावधीत कापसाचे दर 11 हजार रुपये प्रतिक्विंटल जाण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आशेला व्यापाऱ्यांचा व कृषी तज्ञांचा दुजोरा मिळत असल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

यावर्षी उत्पादनात घट घडली त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कापसाच्या क्षेत्रात झालेली घट याव्यतिरिक्त देखील उत्पादनात घट होण्याची अनेक छोटीमोठी कारणे आहेत मात्र कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट हे या मागील प्रमुख कारण सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला आधी पेक्षा जास्त मागणी यावर्षी बघायला मिळाली आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मागणी ही अद्यापही कायम असल्याचे समजत आहे. आणि मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी असल्याकारणाने पुरवठा होत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस कडाडला आणि याचा परिणाम आपल्या स्थानिक बाजारात दिसून आला व प्रथमच कापसाला ऐतिहासिक असा विक्रमी दर प्राप्त झाला. 

राज्यात भल्यामोठ्या क्षेत्रफळावर कापसाची लागवड नजरेस पडते. यावर्षी एकट्या जालना जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर पांढरे सोने उगवले गेले, मात्र असे असले तरी कापसाच्या क्षेत्रात बऱ्याचअंशी घट झाली आहे. जिल्ह्यातील कपाशीचे पीक यावर्षी थोडे जोमात होते, मात्र सुरुवातीच्या काळात जोमात असलेले पीक थोड्या दिवसानंतर अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाले होते. त्यातून कसेबसे शेतकरी राजाने कापसाचे पीक वाचवले मात्र जे काही पीक वाचलेले होते ते पुन्हा एकदा वेचणीच्या वेळी आलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातून हिसकावून घेतले यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण राज्यात नजरेस पडत होती. एकंदरीत कापसाच्या क्षेत्रात झालेली लक्षणीय घट व पावसाच्या लहरीपणामुळे तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे कापसाच्या उत्पादनात झालेली घट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत कापसाला वाढलेली मागणी या कारणांमुळे पहिल्यांदाच कापसाला सोन्यासारखा भाव प्राप्त झाला आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी थोड्याशा उत्पादनात मुबलक पैसा कमविला. 

मात्र सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता उत्पादनात घट आणि वाढते दर यामुळे शेतकरी राजांना विशेष असा फायदा झालेला नजरेस पडत नाही. उत्पादनात घट झाली त्यामुळे जरी दर वाढलेले असले तरी शेतकऱ्यांच्या हातात कापूस शिल्लक नसल्याने वाढत्या दराचा त्यांना विशेष असा फायदा मिळत नाहीये मात्र असे असले तरी काही शेतकरी या परिस्थितीसाठी अपवाद देखिल आहेत या अशाच शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा होताना दिसत आहे. म्हणून कापसाचे बाजार भाव काही शेतकऱ्यांसाठी जेमतेम असले तरी काही शेतकरी यामुळे नक्कीच धनवान झाले असतील.

English Summary: cottons market price is increased tremendously this year because of this reasons
Published on: 16 January 2022, 02:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)