1. बातम्या

यंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी

पुणे : राज्य सरकारने यंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पनन संघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.

KJ Staff
KJ Staff


पुणे  : राज्य सरकाने यंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पनन संघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. खरेदी करण्यात आलेल्या ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले तर ६१४ कोटींचे चुकारे शिल्लक आहेत. यासह विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रावर गर्दी करत कापसाची विक्री केली. या व्यवहारातील ४३२१ कोटी रुपये शेतकऱ्याना अडा करण्यात आले आहेत. तसेच सुमारे ६०० कोटी रुपये शिल्लक आहेत. सरकारने जवळकवलं ९२ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.यंदा कोरोनाचे सावट असताना, आणि पनन महासंघाकडे लोकांची कमतरता असूनदेखील मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करण्यात आली.महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. बऱ्याच वेळा कापूसहा हमीभावाच्या खाली विकला जातो. मागच्या दोन वर्षांच्या काळात कापसाचे भाव मोठ्या प्रमणावर कोसळले होते.

English Summary: Cotton worth Rs 4,936 crore was procured this season Published on: 05 August 2020, 10:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters