News

खरीप हंगामातील सर्व पिकांचे अवकाळी मुळे मोठे नुकसान झाले आहे. कापसाचे देखील अवकाळी मुळे नुकसान झाले अवकाळी मुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली. मात्र कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने उत्पादनातील घट बाजार भाव भरून काढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चढ्या दराने कापूस विक्री करण्यासाठी कापसाची साठवणूक केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या या निर्णयास बाजारपेठ देखील अनुकूल आहे. मात्र विक्रमी बाजार भाव मिळत असला तरी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक कायमच आहे. कापसाला विक्रमी बाजार भाव मिळत असल्याने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कमाईसाठी एक अनोखा फंडा शोधून काढला आहे.

Updated on 06 February, 2022 3:10 PM IST

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कापूस खरेदी करणारे व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना काट्यात झोल करत आहेत. आपल्याकडे मापात कपात केली तर त्याला पाप समजले जाते, मात्र जिल्ह्यातील कापूस व्यापारी सर्रासपणे मापात पाप करत आहेत. यामुळे  विक्रमी बाजार भाव असतानादेखील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील कापूस व्यापारी कापसात पालापाचोळा असतो असे म्हणत एक क्विंटल कापसाचा मागे अर्धा किलो कापसाची कपात अर्थात कटनी करत आहेत. त्यामुळे वाढीव दर असताना देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री परवडत नाही एकंदरीत अमरावतीत दुरून डोंगर साजरे सारखी परिस्थिती बनलेली दिसत आहे. कापूस उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांच्या या दादागिरीला विरोध करत आहेत तसेच कापसाची योग्य मोजणी करण्याची मागणी होत आहे. या वर्षी कापसाच्या उत्पादनात खूप मोठी घट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना मागणी वाढेल आणि कापसाला विक्रमी दर मिळेल अशी आशा होती शेतकऱ्यांच्या आशेवर बाजार भाव देखील खरा उतरला. सध्या बाजारपेठेत कापसाला विक्रमी 11000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

उत्पादनात झालेली घट कापसाच्या बाजार भावातून भरून निघत आहे खरी मात्र स्थानिक पातळीवर कापसाच्या वजनात कपात करून व्यापारी सर्रासपणे शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत योग्य मूल्यमापन करण्याची शेतकऱ्यांची मागणी जोर धरू लागली आहे. या हंगामात कापसाच्या उत्पादनात घट झाली असल्याने कापसाची मागणी वाढली परंतु मागणीप्रमाणे पुरवठा झाला नाही परिणामी कापसाच्या दरात वाढ झाली. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने या हंगामात व्यापारी शेतकऱ्यांचे उंबरठे झिजवत माल खरेदी करत आहेत. 

मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना स्थानिक पातळीवर कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांद्वारे कापसात पालापाचोळा असतो असा युक्तिवाद करत एक क्विंटल कापसामागे तब्बल अर्धा किलो कापसाची कटनी केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर बाजार समितीचा वचक असणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. व्यापाऱ्यांच्या या अनैतिक व्यवहारावर कुठेतरी आळा घालणे गरजेचे आहे नाहीतर यामुळे शेतकरी राजा भरडला जाऊ शकतो.

English Summary: cotton traders looting cotton growers
Published on: 06 February 2022, 03:10 IST