News

यवतमाळ जिल्ह्याला पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून नावाजले जाते. कापसाचे पीक हे येथील शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. त्यामुळे या भागातील बरेच शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात.

Updated on 24 May, 2022 4:19 PM IST

एक जून पूर्वी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कापसाच्या बियाणांची विक्री करू नये, असे राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. त्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशची वाट पकडली आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात जाऊन शेतकरी आता कापूस बियाणांची खरेदी करत आहेत. त्यामुळे कापूस बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे.

यवतमाळ जिल्ह्याला पांढर्‍या सोन्याचा जिल्हा म्हणून नावाजले जाते. कापसाचे पीक हे येथील शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. त्यामुळे या भागातील बरेच शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात. त्यातल्या त्यात शेतकरी अल्पभूधारक असेल तर तो शेतकरी कापसाशिवाय दुसर्‍या पिकाची लागवडच करत नाही.कारण हे पीक त्यांच्यासाठी हमखास उत्पन्न देणार असं पीक आहे.

मात्र सध्यपरिस्थितीला बाजार पेठेत कापसाचे बियाणे मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे नाइलाजास्त्तव बियाणांसाठी शेतकर्‍यांची परराज्यात भटकंती सुरू आहे.आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामादरम्यान साडेचार लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार आहे. दरवर्षी कापूस बियाणांची खरेदी शेतकरी 15 मे पासून सुरु करतात. जर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 80 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला तरच शेतकरी कापसाची लागवड करतात.

शेतात ओढत नेऊन बिबट्याने घेतला शेतमजुराचा बळी; शेतकरीराजांनो काळजी घ्या

शिवाय यवतमाळ जिल्ह्यात ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे. ते शेतकरी मान्सून पूर्व कापसाची लागवड करून भरघोस उत्पन्नही घेत होते. मात्र अलीकडे गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच नाकी-नऊ आणले आहे. बोंड अळीची सायकल तोडायची असेल तर 1 जून पूर्वी, विक्रेत्याने शेतकर्‍यांना कापसाचे बियाणे देऊ नये असे परिपत्रक काढण्यात आले.

रेश्मा नामक म्हशीची कमाल; ठरली देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस

यातून कापसाची किंमत वाढण्याच्या भीतीने शेतकरी आता बाहेरच्या राज्यातून बियाणे खरेदी करत आहेत.शेती करत असताना पूर्वनियोजन अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळे शेतकरी आतापासूनच बियाणांसाठी धावपळ करत आहेत. जर कापसाची लागवड उशिरा करण्यात आली तर बोंड अळीचा शिरकाव होणार नाही. अशी हमी सरकार देणार काय असा शेतकर्‍यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

यंदा मान्सून वेळेत येणार असून शेतकरी पेरणीसाठी तयार आहेत. मात्र कृषी केंद्रातून बियाणे विक्री अजून करण्यात आली नाही. एक जूनपूर्वी बियाणे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही तारीख शेतकर्‍यांसाठी अडचणीची आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांची पेरणीसाठी तारांबळ उडणार आहे.


महत्वाच्या बातम्या:
आता शेतातली कामे होणार झटपट; मराठमोळ्या जोडप्याने तयार केले आगळे वेगळे मशीन

English Summary: Cotton Seeds: Farmers go abroad to buy seeds due to state government's intransigence
Published on: 24 May 2022, 04:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)