बियाण्याच्या उत्पादनामध्ये तसेच बियाण्यावर करण्यात येणारे संशोधन व इतर प्रक्रिया यासाठी जो खर्च येतो त्या आधारे कपाशी बियाण्यांच्या पाकिटांचे किंमत असावी, अशा प्रकारची अपेक्षा देशातील कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांची होती.
याची दखल घेऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाने बीटी कपाशीच्या बीजी 2 या बियाण्याचे पाकीट ची किंमत ते 43 रुपयांनी वाढवली असून या प्रकारची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
काय आहे या निर्णयामागची पार्श्वभूमी?
शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणारे व गुणवत्तापूर्ण बियाणे मिळवण्यासाठी कंपन्यांकडून प्रयत्न केले जातात. त्यासोबतच शेतकऱ्यांची देखील चांगले बियाणे मिळण्याची अपेक्षा असते. त्यासाठी कंपनी विविध प्रकारचे संशोधन करतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे उत्पादनाची प्रात्यक्षिके व संशोधन केले जाते. जर आपण पाहिले तर कापसाच्या भावात वाढ झाली आहे तसेच उत्पादन खर्च देखील वाढला आहे.
बियाण्याच्या संशोधनावर देखील होणाऱ्या खर्चात वाढ झाली असल्याने या सगळ्यांचा विचार करून कपाशी बियाणे पाकिटाच्या दरात उत्पादन खर्चाच्या बरोबरीने वाढ करण्याची अपेक्षा देशातील कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांची होती.
या कंपन्यांच्या अपेक्षांचा विचार करून केंद्रीय कृषी मंत्रालयाने बीजी 2 या कपाशी बियाण्याच्या पाकिटाच्या किमतीत त्रेचाळीस रुपयांनी वाढ केली असून गतवर्षी 767 रुपयात मिळणारे पाकीट आत्ता 810 रुपयांना मिळणार आहे.
केंद्र सरकारचे या विषयाचे संयुक्त सचिव अश्विनी कुमार यांच्या माध्यमातून या प्रकारची अधिसूचना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने 15 मार्चला निर्गमित केलेली आहे. हे कपाशीच्या पाकीट चे दर 2022-23 या वर्षासाठी लागू असतील.
Published on: 21 March 2022, 09:36 IST