News

यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने, कापसाला संपूर्ण हंगामभर चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला आहे. कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे मात्र असे असले तरी कापसाला अजूनही दहा हजार रुपये प्रतिक्विंटल हून अधिक बाजार भाव मिळत आहे.

Updated on 15 March, 2022 7:16 PM IST

यावर्षी कापसाच्या उत्पादनात (Cotton Production) मोठी घट झाली असल्याने, कापसाला संपूर्ण हंगामभर चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला आहे. कापसाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे मात्र असे असले तरी कापसाला अजूनही दहा हजार रुपये प्रतिक्विंटल हून अधिक बाजार भाव (Cotton Rate) मिळत आहे.

राज्यात असे अनेक शेतकरी बांधव आहेत ज्यांनी कापसाची अजून विक्री केलेली नाही, भाववाढीच्या अनुषंगाने कापसाची साठवणूक करून ठेवली आहे. या भाववाढीचा अशा शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून ते आजतागायत कापसाचे बाजारभाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटलहुन अधिकच बघायला मिळाले आहेत.

महत्वाची बातमी:-अरे महावितरणा! पिकांची होळी होऊ दे पण या मुक्या जनावरांना प्यायला पाणी कसं द्यायचं? असं म्हणत शेतकऱ्यांनी........!

या हंगामात अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड बघायला मिळाली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असे उत्पादन प्राप्त झाले नाही. उत्पादनात लक्षणीय घट झाली असल्याने आणि जागतिक बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी दर मिळत असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले गेले.

आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाही कापसाचे भाव अजूनही कायम टिकून आहेत. सध्या कापसाला 10 हजार रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळत आहे. फरदड कापसाला देखील यांना सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण की, यंदा कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत आहे.

कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी बांधवांनी फरदड कापसाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या शेतकरी बांधव फरदड कापूस उत्पादनातुन हात खर्चाला पैसे करून घेत आहेत. असे असले तरी, फरदड उत्पादनामुळे शेतकरी बांधवांना पुढील हंगामात रोगराईचा फटका बसणार असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले गेले आहे.

एवढेच नाही तर फरदड उत्पादनामुळे जमीन नापीक होण्याचा धोका असल्याचे तेथील तज्ञांनी नमूद केले आहे. अमरावती जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंदी एपीएमसीमध्ये कापसाला सर्वात जास्त म्हणजे 10 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. या बाजार समितीत कापसाला कमीत कमी 8 हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला असून सर्वसाधारण दर 10 हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

महत्वाची बातमी:-अरे बापरे! कीटकनाशकात तननाशक घटक म्हणुन द्राक्ष बागा सुकल्या; शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान

English Summary: cotton rate still increased season will end soon but rate still goes up
Published on: 15 March 2022, 07:16 IST