कापसाची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते व खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. आपल्याला माहित आहेच की मागच्या वर्षी कापसाला जो काही उच्चांकी दर मिळाला त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण बघायला मिळाले होते. मागच्या वर्षीच्या उच्चांकी भावामुळे या वर्षी कापूस लागवडीत वाढ होईल असा अंदाज होता.
त्या पद्धतीची लागवड क्षेत्रात वाढ झालीच परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही पाऊस पडला या पावसाचा विपरीत परिणाम हा कापूस पिकावर झाला.
नक्की वाचा:तज्ञ सांगताहेत कपाशीमध्ये डोमकळी दिसताच फक्त करा हा उपाय तरच होईल कमी गुलाबी बोंडअळी
कापसाचे सध्याचे मार्केट आणि येणारा भविष्यकाळ
जर आपण या बाबतीत ओरिगो ई मंडी चे महाव्यवस्थापक तरुण सत्संगी यांच्या मताचा विचार केला तर देशामध्ये जे काही प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहेत, अशा बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तसेच किडींचा प्रादुर्भाव देखील झाल्यामुळे कपाशी पीक हे बऱ्याच ठिकाणी कामातून गेले.
यासंबंधीचा आलेल्या अहवालामुळे भारतीय स्पॉट मार्केटमध्ये कापसाच्या किंमती वधारले असून 46000 रुपये प्रतिगाठपेक्षा जास्त भावात मजबुती दिसून येत आहे. संततधार झालेल्या पावसामुळे कापूस पिकावर वाईट परिणाम झाला. तसेच आपण गेल्या पंधरवड्याचा विचार केला तर कापूस वायद्याचा भाव 21 टक्क्याने वाढून 119.59 सेंटस प्रती पौड या 8 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
नक्की वाचा:सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुस्कान भरपाई द्या- किशोर गाभणे
तसेच सत्संगी यांच्यानुसार, कापूस पिकामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असून तसेच अमेरिकेमधील जो काही स्टॉक आहे तो संपत आल्याने देखील भावात मजबुती दिसून येत आहे.
त्यांचे या बाबतीत म्हणणे आहे की कच्चा तेलामध्ये जी काही घसरण होते व अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे कापसाच्या किमतीत घसरण होते. परंतु आता हे जे काही कनेक्शन होते ते आता तुटलेले दिसत असून जिथे अमेरिकन डॉलर मध्ये पूर्वी कमजोरी होती नंतर ती मंदीच्या भीतीमुळे मजबूत होत आहे.
अमेरिकेमधील जे काही कापूस पीक आहे ते नीचांकी पातळीवर गेल्यामुळे जागतिक बाजारपेठेवर निश्चितच नकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.
जर आपण देशातील कापूस लागवडीचा विचार केला तर गेल्या आठवड्यापर्यंत एकशे तेवीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे जी मागच्या वर्षीच्या कापूस लागवडी पेक्षा सहा टक्क्यांनी अधिक आहे.
Published on: 23 August 2022, 12:45 IST