या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढा भाव यावर्षी आहे. या भाववाडीमागेबरीच कारणे आहेत. गेल्या चार पाच वर्षाचा विचार केला तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घटलेले कापसाचे उत्पादन आणि कापड उद्योगाकडून वाढलेली कापसाची मागणी याचा परिणाम हा कापसाच्या भाववाढीवर होत गेला.
यावर्षी केंद्र सरकारने सुद्धा कापसाला पाच हजार 726 ते सहा हजार पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केला..तसेचब्राझील, अमेरिका, चीन आणि बांगलादेश इत्यादी कापूस उत्पादक देशांमध्ये कापूस उत्पादनात घट झाल्याने मागणीत वाढ झाली. जर देशांतर्गत विचार केला तर पश्चिम बंगाल आणि गुजरात हे कापड उद्योगासाठी प्रसिद्ध राज्य आहेत. या राज्यांमधून देखील कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या सगळ्यांचा परिणाम हा कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांहून अधिक भाव मिळण्यात झाला. परंतु अजूनही शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे भावहेपंधरा ते सोळा हजार रुपयांपर्यंत जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही कापूस साठवून ठेवला आहे, त्यामुळे बाजारपेठेत कापसाचे आवक मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. पाच दशकांपूर्वी महाराष्ट्र मध्ये म्हणजे 1972 च्या आसपास एक तोळा सोन्याचा भाव 250 ते 300 रुपये होता व कापसाचा भाव 250 रुपये प्रतिक्विंटल होता. म्हणजेच एक क्विंटल कापूस विकून दहा ग्रॅम सोनं विकत घेता येत होते.म्हणून कापसाला पांढरं सोनं म्हटलं जात होता. परंतु त्यानंतर कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कापसाची चकाकी कमी झाली.
अगदी दोन वर्षांपूर्वीचा जरी विचार केला तरी कापसाला प्रति क्विंटल तीन ते चार हजार रुपये भाव मिळवण्यासाठी संघर्ष करायला लागत होता. परंतु गेल्या चार-पाच वर्षात देशातील आणि देशाबाहेरील घटलेले कापूस उत्पादन व वाढलेली कापसाची मागणी या सगळ्यामुळे भावात सुद्धा काही प्रमाणात वाढ होत गेली.
Published on: 31 January 2022, 10:16 IST