News

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचे सावट बघायला मिळाले होते, गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली होती.

Updated on 12 February, 2022 6:09 PM IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत चा बाजार भाव प्राप्त होत असल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यासमवेतच संपूर्ण राज्यातील कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचे सावट बघायला मिळाले होते, गुलाबी बोंड अळीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणीत भर पडली होती.

परिस्थिती एवढी बिकट बनली होती की अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीचे पीक सोडून दिले, कपाशीच्या उभ्या पिकात जनावरे चरण्यासाठी बांधली, काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक उपटून रब्बी हंगामातील हरभरा गहू सारखे पिकांकडे लक्ष केंद्रित केले. काही शेतकऱ्यांकडे पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने त्यांनी रब्बी हंगामातील पिके घेण्यास नापसंती दर्शवली आणि वावरात उभे असलेले कपाशीचे पीक जोपासण्यासाठी लक्ष केंद्रित केले आता तब्बल दोन महिन्यांनंतर या वावरात उभ्या असलेल्या कपाशीला बोंड फुटत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या कपाशी पिकाला फुटत असलेले बोंडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत, मात्र फरदड उत्पादन घेणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी धोक्याचे असते असे कृषी विभागाने आधीच नमूद केले आहे.

फरदड उत्पादन घेतल्याने आगामी हंगामात गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ शकतो, एवढेच नाही तर यामुळे जमीन नापीक होण्याचा धोका देखील असतो. मात्र असे असले तरी, सध्या जिल्ह्यात कापसाला साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटल ते साडे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हात खर्चाला पैसे होतील म्हणून सर्रास फरदड कापसाचे उत्पादन घेत आहेत. यामुळे आगामी हंगामात शेतकऱ्यांना किती नुकसान सहन करावे लागते हा तर येणारा काळच सांगेल मात्र तूर्तास कापूस उत्पादक शेतकरी समाधानी असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. सध्या, एक एकर कपाशी च्या क्षेत्रातून एक ते दीड क्विंटल कापसाचे उत्पादन निघत असल्याचे शेतकऱ्यांद्वारे कथन केले जात आहे. एक एकर कापुस वेचण्यासाठी सुमारे दोन हजार रुपये पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे, मात्र विक्रमी बाजार भाव असल्याने उत्पादन खर्च वजा जाता फरदड उत्पादनातून देखील शेतकर्यांना हात खर्चाला पैसे मिळत आहेत. 

त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे फरदड उत्पादनामुळे होणारे नुकसान विसरले असून, तूर्तास जे काही चार पैसे पदरी पडतील त्याकडे आकर्षित झाले आहेत. फरदड उत्पादनाखेरीज ज्या शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अनुषंगाने कापसाची साठवणूक करून ठेवली होते त्यांचाही सूर्योदय झाला आहे. शेतकऱ्यांचा भाव वाढीचा अंदाज अचूक ठरला असून सध्या जिल्ह्यात साडे दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी साठवलेला कापूस विक्रीसाठी नेतील अशी आशा आहे.

English Summary: cotton rate increased once again farmers are happy
Published on: 12 February 2022, 06:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)