News

सध्या कापसाचे भाव दहा हजाराच्या पुढे झेपावत आहेत. सध्या कापसाचे दर उच्चांकी स्थिती वर येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे कापूस दरावर नियंत्रण यावेव वस्त्रोद्योग समूहाला कापूस गाठींचा पुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या काही हालचाली सुरू आहेत.

Updated on 15 January, 2022 11:24 AM IST

सध्या कापसाचे भाव दहा हजाराच्या पुढे झेपावत आहेत. सध्या कापसाचे दर उच्चांकी स्थिती वर येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे कापूस दरावर नियंत्रण यावेव वस्त्रोद्योग समूहाला कापूस गाठींचा पुरवठा सुरळीत व्हावा, या उद्देशाने केंद्र सरकारच्या काही हालचाली सुरू आहेत.

या संदर्भात 17 जानेवारीला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे.

वस्रोउद्योगासमोर कापूस टंचाईचे संकट…..

यावर्षी कापसाचे उत्पादन कमी झाल्याने वस्रोउद्योगा समोर कापसाची अभूतपूर्व टंचाईचे संकट तयार झाले आहे. कापसाची बाजारातील आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. 50 लाख गाठींची तूट देशात दिसत आहे.तसेच कापसाचा ही साठा पुरेसा नाही.

कापसाच्या तेजीचा लाभ वस्त्रोद्योगाला मिळावा यासाठी गाठींचा सूतगिरण्या व सुतीकापड उद्योगाला गतीने पुरवठा अपेक्षित आहे. भारतीय कापडाला युरोप आणि अमेरिकेत मोठी मागणी आली आहे. कापूस उद्योगातील साखळी विस्कळीत होऊ नये यासाठी वस्त्रोद्योगातुनसतत केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. सगळ्या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी येत्या सोमवारी दिल्ली येथे वस्त्रोद्योग मंत्रालयात बैठक होणार आहे. 

या बैठकीला देशातील वस्त्रोद्योग, कापूस प्रक्रिया उद्योगातील लोकांना बोलवण्यात आले आहे.कापूस दरात तेजी आल्यामुळे  टेक्सस्टाईल उद्योगाची चिंता वाढली असून कापसाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्रालयावर दबाव वाढविण्याची तयारी  उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या टेक्सटाइल उद्योजकआता पूर्ण सोमवारी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत.

English Summary: cotton rate in market above 10 thousand central gov take some disision on that
Published on: 15 January 2022, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)