News

यावर्षी एक अंदाज होता की कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होईल. कारण मागच्या वर्षी कापसाला जो काही उच्चांकी दर मिळाला होता, त्या अनुषंगाने कापूस लागवड क्षेत्र वाढेल आणि ते यावर्षी वाढले देखील. परंतु जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाच्या अतोनात नुकसान झाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा कापूस काढणीची सुरुवात झाली तेव्हा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून कापूस पिकाचे प्रचंड नुकसान केले.

Updated on 06 November, 2022 9:10 AM IST

यावर्षी एक अंदाज होता की कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होईल. कारण मागच्या वर्षी कापसाला जो काही उच्चांकी दर मिळाला होता, त्या अनुषंगाने कापूस लागवड क्षेत्र वाढेल आणि ते यावर्षी वाढले देखील. परंतु जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाच्या अतोनात नुकसान झाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा कापूस काढणीची सुरुवात झाली तेव्हा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून कापूस पिकाचे प्रचंड नुकसान केले.

नक्की वाचा:कापुस-सोयाबीन भावासाठी विदर्भात जणआंदोलन उभारणार - राजु शेट्टी

जेव्हा आपण मुहूर्त चे यावर्षी कापसाचे दर पाहिले तर ते 9 ते 12 हजारापर्यंत देखील मिळाले. परंतु आता जर कापूस बाजार भावाचा विचार केला तर सध्या सात हजार ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळताना दिसून येत आहे.

जर सध्याच्या कापूस मार्केटचा विचार केला तर बाजार भाव हे थोडे नरमलेलेच आहेत. परंतु जर आपण सध्याच्या जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर कापसाच्या भावात सुधारणा होताना दिसून येत आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कापूस बाजार साडेपाच टक्क्यांनी सुधारला आहे.

 काय आहे सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिती?

 जर सध्याचा कापसाचा बाजार भावाचा विचार केला तर मोठी सुधारणा यामध्ये दिसून येत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत देखील कापसात थोडीशी वाढ दिसून आली आहे.

नक्की वाचा:बाप रे ! शेतकऱ्यांना चुना लावत पीक विमा कंपन्यांनी 5 वर्षात कमवला इतक्या कोटींचा नफा

तज्ञांनी  दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात कापसाचे बाजार भाव सुधारले असल्यामुळे देशांतर्गत  बाजारपेठेत कापसाचे प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपयांची वाढ यामध्ये दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच कापसाच्या दरात वाढवण्याची एक शक्यता आहे.

जर आपण दोन दिवसाचा विचार केला तर काही देशांतर्गत लिलावांमध्ये कापसाला सात हजार रुपये ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. महाराष्ट्रात देखील कापसाच्या दरात वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढ झाल्यामुळे ही किंचितशी दरवाढ महाराष्ट्रात देखील नमूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या बाजारपेठेचा विचार केला तर कापूस सात हजार 100 ते 8500 प्रतिक्विंटल पर्यंत आहे. या क्षेत्रातील जाणकार लोकांचा मताचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यामध्ये कापसाला मागणी वाढेल व  कापसाच्या बाजारपेठेत अजून वाढवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होऊ शकते.

जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापसाला उत्तम बाजार भाव मिळण्याची शक्यता असून फेब्रुवारी महिन्यात 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी कापसाची विक्री करताना बाजारपेठेचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे असून ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहे.

नक्की वाचा:Kanda Bajar Bhav: शेतकऱ्यांना कांदा बनवणार मालामाल! ‘इतकामिळाला कांद्याला दर

English Summary: cotton rate growth in international market so can indian market rate can growth
Published on: 06 November 2022, 09:10 IST