सध्या नवीन कापसाची देखील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक होत असून इतर पिकांसारखे कापसाचे देखील पावसाने गत केले असून कापसामध्ये देखील ओलावा येत असल्यामुळे कापसाचे दर देखील काहीसे कमीच आहेत. परंतु येणारा काळ हा कापसासाठी चांगला असण्याची दाट शक्यता आहे. कारण जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती पाहिली तर गेल्या आठवड्यामध्ये कापसाचे भाव जवळजवळ 14 टक्क्यांनी वाढले असून याचा परिणाम देशाअंतर्गत कापसाच्या दरवाढीत दिसून येत आहे.
जर आपण देशांतर्गत कापूस बाजाराचा विचार केला तर देशाच्या वायदे बाजारामध्ये कापसाने प्रतिगाठ पन्नास हजार रुपयांचे पातळी गाठले आहे.
नक्की वाचा:Kanda Bajar Bhav: या बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव
कापसाचे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत कापसाच्या भावात सुधारणा झाली असून युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चर आणि आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने 2022-23 या कालावधीत जागतिक कापूस उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
या कारणामुळे कापसाच्या भावाला आधार मिळून देशातील कापसाचा भाव प्रतिगाठ पन्नास हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जर आपण कापसाच्या एका गाठीच्या वजनाचा विचार केला तर ते 170 किलोची असते. जर आपण कापूस या पिकाची अमेरिकेतील स्थिती पाहिली तर त्या ठिकाणी दुष्काळ असल्यामुळे कापूस पिकाची स्थिती फारशी चांगली नाही.
या कारणामुळे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चरला युनायटेड स्टेट मधील कापूस उत्पादन सुमारे 40 दशलक्ष गाठींनी कमी राहण्याची अपेक्षा होती व निर्यात देखील अडीच दशलक्ष गाठीने कमी राहण्याचा एक त्यांचा अंदाज आहे.
नक्की वाचा:सूतगिरणीच्या निवडणुकीतून बड्या नेत्यांची माघार, निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष..
अमेरिकेतून होणारी कापसाचे निर्यात जर कमी झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणीच्या मानाने कापसाचा पुरवठा कमी होऊन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातून कापसाची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे बाजार भाव येणाऱ्या काळात सुधारू शकतात.
जर आपल्याकडील परिस्थिती पाहिली तर कापूस लागवड क्षेत्रामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली होती परंतु परतीच्या पावसाने खूप नुकसान केल्यामुळे कापूस पिकावरील परिणाम झाला आहे. आपल्याकडील कापूस उत्पादक राज्यांमध्ये उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातील कापूस बाजारात देखील वाढ झाली आहे. जर आपण भारतातील काही बाजार समित्यांमधील कापसाच्या बाजार भावाचा विचार केला तर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळत आहे.
महत्वाचे म्हणजे हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागच्या आठवड्याचा विचार केला तर न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मध्ये कापसाच्या किमती चौदा टक्यांनी वाढून 125 सेंट वर पोहोचल्या.
नक्की वाचा:ऊस दराचे आंदोलन पेटले, पंढरपुरात आंदोलनाला हिंसक वळण, ट्रॅक्टरचे टायर फोडले..
Published on: 28 October 2022, 05:16 IST