महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळीकडे कापसाचे पीक ओलेझाले आहे. त्यामुळे कापसामध्ये बारा टक्केपेक्षा जास्त ओलावा असल्याचे कारण देत सध्या खासगी बाजारामध्ये कापसाचे दर घसरले आहेत. चक्क हमीभावापेक्षा ही खाली आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मागच्या वर्षीचा विचार केला तरकापसाची लागवड ही 6.44टक्क्यांनी घटली आहे. कापूस निघण्याच्या काळा मध्येच जास्तीचा पाऊस आल्याने कापसाची बोंडे काळे पडले आहेत. असे असले तरी कापूस पिकाची परिस्थिती समाधानकारक आहे. कापसाला खाजगी बाजारात चांगला दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा द्विगुणित झाल्या होत्या.
परंतु आता हेच खाजगी व्यापारी पहिल्या कापसात ओलावा जास्त आहे हे कारण देत आठ हजार रुपये दर असलेला कापूस चक्क पाच हजारांपर्यंत घसरला आहे.
शासनाने कापूस खरेदी बाबत नोव्हेंबर मध्ये केंद्र सुरू करण्याची सूचना यापूर्वी केली होती. परंतु कापूस पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये असमर्थता दर्शवली आहे. त्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदी शक्य नसल्याचे सांगितले होते. अजूनही सरकारी खरेदीबाबत स्पष्ट धोरण ठरलेले नाही. त्यामुळे पैशांची गरज असल्याने बरेच शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. याचाच फायदा खाजगी व्यापारी घेत असून कापसाचे दर पाडण्यात आले आहेत.
कापूस पणन महासंघाच्या बैठकीला मुहूर्ताची प्रतीक्षा कापूस खरेदीबाबत धोरण तसेच केंद्र निश्चितीसाठी पणन महासंघाची बैठक आतापर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मुळे पणनच्या संचालक मंडळाच्या बैठकीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जोपर्यंत पणन महासंघाची केंद्र सुरू करण्याची तारीख निश्चित करीत नाहीत तोपर्यंत कापसाचे भाव कमीचराहण्याची शक्यता आहे.
Published on: 10 October 2021, 10:01 IST