यावर्षी आपल्याला माहिती आहे की सोयाबीन जेव्हा बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली तेव्हा सोयाबीनला चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा उद्योग की सोयाबीनचे दर हे नऊ ते दहा हजार रुपयांपर्यंत जातील.
त्यात अपेक्षेप्रमाणे काही काळात दरवाढ झाली. संतोष सोयाबीनच्या भावामध्ये कालांतराने सातत्याने घसरण होत गेली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात नांदतात त्याची साठवणूक करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यामुळे आता काही प्रमाणात सोयाबीन च्या दरात वाढ झाली असली तरी अजूनही सोयाबीनचे साठवणूक केली जात असल्याने सोयाबीन शेतकऱ्यांनी विकले नाही.
काहीशी अशीच परिस्थिती कापसाची झाले आहे. या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढा भाव आहे. त्याला कारणही तसे बरेच आहेत.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेकापूस पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मागणी वाढल्यामुळे तसेचदेशांतर्गत मागणी सुद्धा वाढल्याने आणि त्या मराठी कापसाचा पुरवठा कमी होत असल्याने कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळत आहे. कापसाला काही दिवसांपूर्वी आठ हजारांच्या पुढे भाव होता.
परंतु त्या मानाने कापसाचे उत्पादन होऊ शकले नाहीये आणि मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे कापसाचे भाव अजून वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे कापसाच्या साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे अपेक्षित भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी कापसाची विक्री करणार नाहीत असेच चित्र दिसत आहे. कापूस हंगाम सुरू झाला तेव्हा सुरुवातीला नऊ ते दहा हजार रुपयांचा दर कापसाला मिळत होता.कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आले असताना कापसाचे दर आठ हजार च्या पुढे आहेत. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त बाबांची अपेक्षा असल्याने अजूनही कापूस बाजारात हवा तेवढा येत नाही.
उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा हेच केले होते जेव्हा सोयाबीनचे भाव घसरले तेव्हा सोयाबीन ची विक्री केलीच नाही. सोयाबीनच्या साठवणुकीवर भर दिला.साडेचार हजार रुपये क्विंटलला सारे सोयाबीन मागच्या आठवड्यात सहा हजार ते सहा हजार दोनशे दरम्यान आले. याला शेतकऱ्यांच्या एकीचे बळ असेच म्हणावे लागेल. परंतु आता चित्र उलटे दिसत आहे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला तरीही सोयाबीनचे दर घटू लागत असल्याने आता आवक वाढत आहे.
Published on: 16 December 2021, 09:28 IST