News

खान्देशरत्न जळगाव सुवर्णनगरी म्हणुन सोन्याच्या आभूषणासाठी तर केळीच्या उत्पादणासाठी जगात ख्यातीप्राप्त आहे. खान्देश प्रांतातील जळगाव जसे केळीसाठी आणि सोन्यासाठी जगप्रसिद्ध आहे तसेच पांढरे सोने म्हणुन ओळखले जाणारे कापसाच्या उत्पादणासाठी देखील ओळखले जातो. सोन्याच्या व्यापारापासून ते शेती क्षेत्रात आपल्या योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगावला अतिवृष्टीने पार झोडपून काढलंय. शेतकरी आपल्या शेतातील उभे पांढरे सोन्याची राख होताना पाहून आपले दुःख कसेबसे लपवत आहे.

Updated on 01 October, 2021 6:53 PM IST

खान्देशरत्न जळगाव सुवर्णनगरी म्हणुन सोन्याच्या आभूषणासाठी तर केळीच्या उत्पादणासाठी जगात ख्यातीप्राप्त आहे. खान्देश प्रांतातील जळगाव जसे केळीसाठी आणि सोन्यासाठी जगप्रसिद्ध आहे तसेच पांढरे सोने म्हणुन ओळखले जाणारे कापसाच्या उत्पादणासाठी देखील ओळखले जातो. सोन्याच्या व्यापारापासून ते शेती क्षेत्रात आपल्या योगदानासाठी ओळखल्या जाणाऱ्या जळगावला अतिवृष्टीने पार झोडपून काढलंय. शेतकरी आपल्या शेतातील उभे पांढरे सोन्याची राख होताना पाहून आपले दुःख कसेबसे लपवत आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांशी भागातील शेतात पाण्याने पार धिंगाणा घातलाय, नद्यानी अकराळ-विकराळ स्वरूप धारण केलय. वावरे आता जणु आता धरण झालीत. अशी व्यथा जळगाव जिल्ह्याची झालीय, आणि शेतकरी हताश होऊन सरकार दरबारीं टिपटीपत्या डोळ्यांनी मदतीची भीक मागतोय पण अजूनतरी सरकार झोपलेच आहे.

 शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत

जिल्हातील शेतकरी सांगत आहेत की, मेहनतीने कपाशीची लागवड केली, कसेबसे आताच रोगापासून कपाशी वाचवली आणि गुलाब चक्रीवादळाच्या एका फटक्याने सर्व पिक मातीमोल झाले. जेवढा फटका कोरोना काळात असलेल्या लॉकडाउन मुळे बसला नाही त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने हे वादळ आणि अतिवृष्टी दुःख देऊन गेले आहे. शेतकरी पिकांची लागवड ही मोठ्या आशेने करतो, आपली स्वप्ने रंगवतो पण हे अशे नैसर्गिक संकट एका सेकंदात सर्व नाहीसे करून निघून जातो.

पदरी पडली निराशा….

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला आलेल्या जोरदार पावसाने कांद्याच्या पिकाची राख-रांगोळी केली आणि आता जाता-जाता गुलाब चक्रीवादळमुळे आलेल्या अतिवृष्टीने हमीच कापसाचे पिकही हेरावून घेतले. आता शेतकऱ्याने करावं तरी काय? वर्षभर आपला उदरनिर्वाह कसा भागवायचा असा सवाल शेतकरी आता देवाकडे करत आहेत.

शेतकऱ्यांनी ह्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून अनुदान ताबडतोब द्यावे अशी मागणी सरकारकडे केलीय. फक्त कापुसच नाही तर इतर सर्व पिक जे ह्या अतिवृष्टीत सापडली आहेत त्या सर्वांसाठी अनुदाणाची घोषणा करावी, जर अनुदान मिळालेच नाही तर शेतकरी शेती कशी बरं करणार? जेवढी होती नव्हती सर्व जमापुंजी शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लावून दिली आता जगायला काहीतरी शेतात टाकावे लागेल, त्यामुळे अनुदान लवकर द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 

 कपाशी लागवड आणि महाराष्ट्र

कपाशी हे एक नगदी पीक आहे. कपाशीला पांढरे सोने म्हटले जाते, परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती अशी आहे की येथील कापूस उत्पादक शेतकरी त्यांच्या अडचणींमुळे चर्चेत राहतात. देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि पंजाब इ. राज्यांचा समावेश होतो. देशात जास्तीत जास्त कापसाची लागवड महाराष्ट्रातच केली जाते.  राज्यात 33 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे.

 

English Summary: cotton producer farmer anxious due to cyclone
Published on: 01 October 2021, 06:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)