News

यावर्षी पांढर्‍या सोन्याला कधी नव्हे तो सोन्यासारखा भाव प्राप्त होत आहे. राज्यात सर्वत्र कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे. जिल्ह्यातील आर्वी बाजारपेठेत कापसाचे भाव गेल्या आठवड्यापासून स्थिरावल्याचे चित्र दिसत आहे.

Updated on 19 January, 2022 9:05 PM IST

यावर्षी पांढर्‍या सोन्याला कधी नव्हे तो सोन्यासारखा भाव प्राप्त होत आहे. राज्यात सर्वत्र कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव प्राप्त होत आहे. जिल्ह्यातील आर्वी बाजारपेठेत कापसाचे भाव गेल्या आठवड्यापासून स्थिरावल्याचे चित्र दिसत आहे

बाजारपेठेत दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, कापसाच्या बाजार भावातअजून तेजी बघायला मिळणार आहे आणि कापसाचे दर प्रतिक्विंटल अकरा हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी जिल्ह्यात विशेषता आर्वी व आजूबाजूच्या परिसरात वातावरणात बदल झाल्याने कापसाचे मोठे नुकसान होत आहे. मागच्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे, तसेच नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे देखील जिल्ह्यातील कापसाचे या पिकाला मोठा फटका बसला आहे, या निसर्गाच्या लहरीपणामुळे कापसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मते अवेळी आलेल्या पावसामुळे व तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे कापसाची पाहिजे तशी उतारी यावेळी नजरेला पडत नाहीये, त्यामुळे उत्पादनात घट होणार एवढे नक्की.

शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या संकटात सापडल्याचे चित्र नजरेला पडत आले आहे. यावर्षी देखील निसर्गाचा लहरीपणा कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा अंगाशी आला होता, पावसाच्या अवेळी आगमनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट घडून आली आहे. मात्र, असे असले तरी यावर्षी कापसाला विक्रमी बाजार भाव प्राप्त होत असल्याने उत्पादनाची कसर बाजारभाव काढून देत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

यावर्षी प्राप्त होत असलेल्या बाजार भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदी असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच येत्या काही दिवसात बाजारभावात अजून वृद्धी होण्याचे संकेत असल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांचा आनंद गगनात मावत नाहीये.

English Summary: cotton prices will increased in this market
Published on: 19 January 2022, 09:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)