News

महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकंदरीत भारतात जास्त पावसामुळे कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले होते व त्यासोबतच बोंडअळीचा कहर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यामुळे कापसाला दहा हजाराच्या पुढे इतका भाव शेतकऱ्यांना मिळाला. त्या अनुषंगाने यावर्षी कापसाला भाव कसा राहील किंवा कापसाचे लागवड क्षेत्राविषयी अनेक प्रकारचे अंदाज वर्तवले गेले.

Updated on 07 August, 2022 9:49 AM IST

महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर एकंदरीत भारतात जास्त पावसामुळे कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले होते व त्यासोबतच बोंडअळीचा कहर मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यामुळे कापसाला  दहा हजाराच्या पुढे इतका भाव शेतकऱ्यांना मिळाला. त्या अनुषंगाने यावर्षी कापसाला भाव कसा राहील किंवा कापसाचे लागवड क्षेत्राविषयी अनेक  प्रकारचे अंदाज वर्तवले गेले.

त्यांचा व इतर आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारपेठ परिस्थितीचा विचार केला तर येणारा काळ कापसाच्या दराबाबत कसा असेल? याबाबत एक अंदाज बांधता येऊ शकतो.

नक्की वाचा:कापूस पिकातील काय असते डोमकळी आणि तिचे व्यवस्थापन थेट तज्ञाकडून

 एकंदरीत कापसाची परिस्थिती

 मागच्या वर्षाची जी काही बाजारपेठीय परिस्थिती होती, त्यामुळे या वर्षी कापूस लागवडीत वाढ होईल असा एक अंदाज होताच व तो अंदाज खरा ठरत  यावर्षी लागवड क्षेत्रात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात विचार केला तर कापसाचे दर सध्या कमी आहेत. या कारणामुळे देखील सुरुवातीच्या काळात असलेली कापूस लागवडीतील जि काही वाढ होती ती सध्या कमी झाली आहे.

एकंदरीत पाच ऑगस्ट पर्यंतच्या एक आकडेवारीचा विचार केला तर सात टक्क्यांनी कापूस लागवड क्षेत्रात वाढ अधिक आहे. जर आपण मागच्या वर्षीच्या 113 लाख हेक्‍टर लागवडीखालील क्षेत्राच्या तुलनेत या वर्षी 121 लाख हेक्‍टर टन कापूस लागवड झाली.

नक्की वाचा:Insect Management:'या' काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी करा,कपाशीवरील रसशोषक किडीपासून होईल सुटका

परंतु जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पावसाने दमदार हजेरी लावली व प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे नंतरच्या काळात ही लागवड क्षेत्रातील जी काही वाढ आहे, येणाऱ्या काळात कमी होऊ शकते. एवढेच नाही तर तेलंगणा आणि हरियाणा यासारख्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये कपाशीवर बोंडअळी आल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे तेथील कापसाचे उत्पादन हे निश्चितपणे घटू शकते.

त्यामध्ये जर आपण आंतरराष्ट्रीय परिषदेचा विचार केला तर अमेरिकेसह इतर देशांमध्ये देखील वातावरणाचा फटका कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत कापसाच्या दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.

त्यासोबतच देशातील वायदे बाजारात देखील कापसाचे दर सुधारले आहेत. त्यामुळे हे सगळे आंतरराष्ट्रीय बाजाराची परिस्थिती व देशांतर्गत लागवड क्षेत्र व इतर परिस्थिती इत्यादींमुळे कापसाचे दर टिकून राहतील, हीच शक्यता आहे.

नक्की वाचा:...तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, राजू शेट्टींनी सांगितला बाजारभाव मिळण्याचा सोप्पा मार्ग

English Summary: cotton market rate situation in will be coming few month
Published on: 07 August 2022, 09:49 IST