News

मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याचाच परिणाम या वर्षी कापसाच्या भाववाढीवर झाला.

Updated on 23 February, 2022 4:39 PM IST

मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. याचाच परिणाम या वर्षी कापसाच्या भाववाढीवर झाला.

कधी नव्हे एवढा भाव कापसाला मिळत असल्याने शेतकरी यावर्षी खुश आहेत. यावर्षी कापसाचे चमक हे दहा हजाराच्या पुढे आहे.पर्यंतच्या दरवाढीस जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगासह वस्त्रोद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे. कापसाचे बाजार भाव कशा पद्धतीने कमी होतील यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील लॉबी सक्रिय झाली आहे असे आरोप होऊ लागले आहेत.जर मागच्या दीड ते दोन महिन्याचा विचार केला तर कापसाची वाटचाल दहा हजाराच्या पुढे चालू आहे. महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये 11 हजार पर्यंत देखील कापसाचे भाव गेले आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना चांगल्या भावाचा फायदा होत असताना मात्र कापसावर अवलंबून असलेली जिनिंग वस्त्रोद्योगाच्या आर्थिक घडीला फटका बसू लागला आहे. कापसाची भाव वाढ झाल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला जास्त भावाने कापूस खरेदी करावा लागत आहे. जर रुईउत्पादनाचा विचार केला तर एक क्विंटल  कापसाच्या माध्यमातून 35 ते 36 किलो रुईचे उत्पादन तसेच 62 63 किलो सरकी निघणे अपेक्षित असते.सरकी आणि रुई यांचे प्रमाण 35-65 असले तरच कापसाला जास्तीचा भाव देणे परवडण्याजोगी असते. परंतु कापसातून रुई व सरकी चे हवेचे प्रमाण मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे

त्यामुळे यावर्षी सरकी आणी ढेप चे भाव देखील वाढले आहेत. सरखीच्या भावामध्ये वाढ झाल्याने तेलाचे देखील भाव वाढले आहेत. तसेच मजुरी, मशीनचा घसारा खर्च विद्युत, वाहतूक इत्यादी खर्च लागू होत असल्याने कापड महागण्याची  शक्यता आहे. त्यामुळे हे कापसाचे वाढलेले भाव कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग लॉबी सक्रिय झाल्याची एक प्रकारची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

 अशा पद्धतीने ठरतो कापसाचा भाव

जिनिंग मधून तयार झालेली खंडी पासून किती लांबीचे सूत निघू शकते यावर कापसाचेभाव अवलंबून असतात यावर्षी कापसाचा खंडी च्या भावाचा विचार केला तर ते 29 प्लस खांडी चे भाव 76 ते 70 हजार रुपये प्रति खंडी झाले आहेत.सुतगिरणी यातून तयार होणारे सूतकपडा मिल काउंट नुसार खरेदी करते. 

वीस ते तीस काउंट असल्यास ते सूत उत्तम मानले जाते. मागच्या वर्षी काउंटचा दर 180 ते 190 प्रति किलो होता. यावर्षी तो 250 ते 300 रुपये इतका झाला आहे.या सगळ्या आर्थिक गणिताचा परिणाम कापडनिर्मिती वर होतो.(स्रोत-सकाळ)

English Summary: cotton industries get oppose to growth rate of ccotton in market
Published on: 23 February 2022, 04:39 IST