खरीप हंगामात झालेल्या अवखाळी आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी राजा अडचणीत आला आहे. अचानक पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीन तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे:
पावसामुळे खरीप हंगामातील 50 टक्के उत्पादनात घट झालेली आहे. त्यामुळे पिकांचे सुद्धा भाव वाढले आहेत.खरीप हंगामात जरी पिकाचे नुकसान झाले असले तरी कापसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण यंदा च्या वर्षी कापसाचा भाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवाय दिवाळी होइपर्यंत कापसाचा भाव हा वाढतच राहणार आहे. कापसाचा वापर अधिक वाढल्यामुळे कापसाच्या दरात मोठी वाढ होत आहे.
कापसाची वेचणी करताना घ्यावी लागणार ही काळजी :-
खानदेशाच गेल्या काही दिवसांपासून गुजरात, आंध्र प्रदेश या विविध राज्यातुन व्यापारी कापूस खरेदीसाठी खानदेशात येत आहेत. त्यामुळं कापसाचा भाव हा 8250 वर पोहचला आहे. तसेच जागतिक स्तरावर कापसाला मोठी मागणी असल्यामुळे भाव वाढतच चालला आहे.तसेच कोरोना काळात सुद्धा कापसाची मागणी वाढली होती त्यामुळे मागच्या वर्षीचा कापसाचा साठा अजिबात शिल्लक राहिला न्हवता. त्यामुळे दिवसेंदिवस कापसाचा भाव वाढतच चालला आहे.यंदा च्या साली राज्यात कापसाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे निर्यात सुद्धा होणार नाही त्यामुळे भाव वाढतच राहणार आहेत. ज्यांनी कापसाची साठवणूक केली त्यांना सुद्धा मोठा फायदा झालेला आहे.
जर का योग्य वेळेत कापसाची वेचणी केली नाही तर कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. तसेच कापूस वेचणी च्या वेळी पाला पाचोळा,कचरा येणार नाही याची काळजी घ्यावी. जर का कापूस स्वच्छ असले तर भाव सुद्धा योग्य मिळणार आहे. कापूस वेचणी झाल्यावर कापूस हा कोरड्या खोलीत ठेवावा. त्यामुळे कापूस वेचणी करताना ही काळजी घेणे आवश्यक असते.
Published on: 07 November 2021, 09:47 IST