यावर्षी शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे, आधी अतिवृष्टी नंतर अवकाळी व त्यानंतर बदललेल्या हवामानाचा शेतकऱ्यांना चांगलाच मोठा फटका बसला आहे, या निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी राजांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आसमानी तर अस्मानी सुलतानी संकटाने देखील शेतकरी राजा पूर्णता हतबल झाला आहे. शेतकरी राजा सोन्यासारखे पीक पिकवतो, चांगले दर्जेदार उत्पादन देखील घेतो मात्र एवढेच त्याचे हातात असते. त्या दर्जेदार मालाला बाजार भाव किती मिळेल हे त्याच्या हातात नसते आणि म्हणूनच जर उत्पादन दर्जेदार मिळाले तर बाजारभाव कमी मिळतो आणि बाजार भाव चांगला असला की उत्पादन कमी असते या एकंदरीत परिस्थितीमुळे बळीराजाची परिस्थिती कधीच सुधरत नाही.
यंदा देखील निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या बळीराजाला सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी सोयाबीन पिकाला सुरुवातीला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला होता, मात्र हा बाजारभाव जास्त काळ टिकला नाही आणि नंतर सोयाबीनचे रेट खूप पडलेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील एक अनोखी शक्कल लढवली होती त्यांनी त्यावेळी सोयाबीन विक्री करण्यापेक्षा सोयाबीनला स्टोर करण्यावर जास्त भर दिला, परिणामी सोयाबीनची आवक ही मंदावली होती आणि बाजारात सोयाबीन मागणी वाढली होती म्हणून सोयाबीनला चांगला रेट प्राप्त होऊ लागला होता. आता कापूस पिकावर देखील तेच संकट येताना दिसत आहे.
यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला, कापूस हा सुरुवातीला जवळपास दहा हजार क्विंटल दराने विकला जात होता. मात्र आता कापसाचे दर हे खूपच पडले आहेत. आणि म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगलाच सावध पवित्रा आता उचललेला दिसतोय. आता कापूस उत्पादक शेतकरी कापूस विक्री करण्यावर जास्त भर देताना दिसत नाहीयेत याउलट आता कापूस उत्पादक शेतकरी कापसाचे भंडारण करण्यावर अधिक भर देत आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात कापसाचे दर वाढतील अशी आशा आहे.
सध्या मराठवाड्यात कापसाला आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराने बाजार भाव मिळत आहे, सुरुवातीच्या काळात दहा हजार प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत होता आणि म्हणून शेतकऱ्यांना आशा आहे की आगामी येत्या काळात कापसाला चांगला भाव प्राप्त होऊ शकतो, त्यामुळे शेतकरी आता सध्या विक्री करण्यावर जास्त जोर न देता साठवणुकीवर जोर देताना दिसत आहेत.
Published on: 27 December 2021, 01:38 IST