यावर्षी झालेली अतिवृष्टी, कापूस हंगामाच्या अंतिम टप्प्यात आलेला अवकाळी पाऊस तसेच कापसाच्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेत वाढलेली मागणी याचा प्रभाव हा कापसाच्या भाववाढीवर दिसून येत आहे
महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक पट्टापट्टा म्हणून विदर्भाला ओळखले जाते. विदर्भातील वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस उद्योगाचे मोठे नेटवर्क आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस भावात तेजी आली असून 31 डिसेंबर रोजी सिंधी रेल्वे येथील बाजार समितीत कापसाला विक्रमी 9900 रुपयांचा दर मिळाला होता. तसेच काल बुधवारी वर्धा बाजार समितीमध्ये कापसाने चक्क दहा हजारांचा पल्ला ओलांडत दहा हजार पन्नास रुपये भाव मिळाला.
कापूस उद्योगाच्या बाबतीत जर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर तिथे जिनिंग प्रेसिंग उद्योग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याची कापसाची गरज फार मोठी आहे. त्यासोबतच कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांकडून देखील कापसाचे मागणी सातत्याने वाढत असून त्याचा परिणाम हा कापूस दर वाडीत होताना दिसत आहे. सिंधी रेल्वे बाजार समितीमध्ये कापसाचा दर हा 9700 रुपयांवर स्थिर असून वर्धा बाजार समितीत कापूस दराने दहा हजारांची झळाळी घेतली आहे.
बुधवारी वर्धा बाजार समितीमध्ये कापसाचे 800 क्विंटल आवक होऊन 9500 पासून ते दहा हजार पन्नास रुपयांपर्यंत कापसाचे दर होते.
यावर्षी केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव सहा हजार पंचवीस रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे कापसाच्या खुल्या बाजारात मध्ये कापसाला अधिक दर मिळत असल्याचे दिसून येत आहे. हमीभावापेक्षा खुल्या बाजारामध्ये कापसाला जास्त भाव मिळत असल्याने सीसीआय व पणन महासंघाची खरेदी या वर्षी होऊ शकले नाही.कालांतराने अजून भाव वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: 06 January 2022, 05:09 IST