या वर्षी झालेली अतिवृष्टी अशाच वेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे सगळेच पीक यांचे अतोनात नुकसान झाले.
त्याला कापूस हे पीक सुद्धा अपवाद नाही. तसेच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेली मागणी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अमरावती खाजगी बाजारात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कापसाला विक्रमी 9500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. कापसाला मिळालेला हा इतिहासातील सर्वाधिक दर असल्याचे म्हटले जात आहे.
विदर्भ म्हटलं म्हणजे कापूस हे सगळ्यात प्रमुख पीक आहे. अतिवृष्टी तसेच बोंड आळी चा मोठा प्रादुर्भाव यामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली.तसेच संपूर्ण राज्याचा विचार तर सारखीच परिस्थिती आहे. तसेच देशातील इतर राज्य आणि कापूस उत्पादक जगातील काही देश यामध्ये देखील कापूस उत्पादन कमालीचे घटले आहे. त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे यंदा कापसाला चांगले भाव मिळत आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. जर कापसाला अशाच प्रकारचा भाव राहिला तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज करण्याची गरज पडणार नाही व त्याचा परिणाम आत्महत्यांमध्ये घट होण्यावर देखील पाहायला मिळेल असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळामध्ये अजून भाव वाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: 03 January 2022, 09:27 IST