News

खरीप हंगामाचा विचार केला तर राज्याच्या बहुतांशी भागात विशेषतः विदर्भ, खानदेश, मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अजून दोन-तीन महिन्यात खरीप हंगाम सुरू होईल.

Updated on 08 April, 2021 9:38 PM IST

खरीप हंगामाचा विचार केला तर राज्याच्या बहुतांशी भागात विशेषतः विदर्भ, खानदेश, मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. अजून दोन-तीन महिन्यात खरीप हंगाम सुरू होईल.

यंदा पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी कापूस लागवड करतील असा अंदाज आहे. त्यावेळेस जाणकारांनी मत व्यक्त केले आहे की जर पाऊस वेळेवर झाला तर लागवडीत घट अपेक्षित आहे आणि पाऊस उशीर झाला तर मागच्या वर्षी इतकी लागवड होऊ शकते. सध्या कापूस या पिकाचा विचार केला तर बोंड सड आणि बोंड आळी चा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे कारण कापूस लागवडीत घट पुण्याचे आहे.

 मागील वर्षी कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरपूर प्रमाणात मांडला होता. त्यात भर म्हणून यावर्षी केंद्र सरकारने कपाशीचा बियाण्यांचे दर वाढवण्याचा परवानगी दिली आहे. गेल्याच आठवड्यात बी जी वन आणि bg 2 कपाशी बियाणे दरात पाच टक्के वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरीकापूस लागवडीकडे पाठ फिरवतील अशी शक्यता आहे.  जगात सुद्धा . अमेरिकेच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार तेथे कापसाची लागवड 120 लाख हेक्टर  वर अपेक्षित आहे.  माझे अमेरिकेतील कापसाच्या लागवड क्षेत्र यंदाही गेल्यावर चित्र जाण्याची शक्यता आहे.  त्याच्या मागे एक महत्त्वाचे कारण असे आहे की अमेरिकेतसोयाबीन आणि मका पिकावरील परतावे कापसाच्या तुलनेत जास्त असल्याने कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता आहे. यावर्षी कापसाचा विचार केला तर पाकिस्तानने सुद्धा कापसाची लागवड कमी केली होती.  तेथील कापूस लागवडीखालील क्षेत्र हे जवळजवळ दहा टक्‍क्‍यांनी घटले होते.

 

जागतिक पातळीचा विचार केला तर कापसाच्या भावात अनिश्चिततेचे सावट कायम राहिले. फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकेतील आयईएस वरील कापसाच्या वायद यांनी भरत घेतली. मार्चच्या दोन आठवड्यांमध्ये ती बढत कमी झाली. त्याचा थेट परिणाम भारतीय कापसाच्या किंमती वर झाला असला तरी अस्थिरतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कापसाचे देशांतर्गत तर 45 हजार ते 47 हजार रुपये प्रति खंडी राहिले आहेत. यावर्षी भारतीय कापूस महामंडळाने कापसाची विक्री केल्याने दर स्थिर राहण्यास मदत झाली. महामंडळाने केलेल्या विक्रीमुळे भारतातील दर निर्यातीच्या दृष्टिकोनातून स्पर्धात्मक राहिला.

सध्या कापसाचे दरसहा हजाराच्या पुढे गेले आहेत. परंतु ज्यावेळी शेतकऱ्यांचा कापूस हा बाजारामध्ये येत होता त्यावेळी सुरुवातीच्या काळात कापसाचे दर हे 4500 ते 5200 रुपयांच्या दरम्यान होते. शेतकऱ्यांनी त्यांचे उत्पादन वाढल्याचे गृहीत धरून विक्री केली. तसेच व्यापारी आणि मिल्स ने मी कमी दराने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला. त्यानंतर उत्पादन घटीचे अंदाजाने दरात वाढ झाली.

 

काही ठिकाणी कापसाच्या दराने सात हजाराचा टप्पाही पार केला. परंतु या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या दरवाढ होईपर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्याकडचा कापूस विकून टाकला होता. त्याच्यामागे महत्वाचे कारण म्हणजे कापूस साठवण करण्यासाठी लागणाऱ्या जागेची कमतरता आहे. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा हा फारच अल्प शेतकऱ्यांना मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी एवढा खर्च करूनही हाती काहीच लागले नाही त्यामुळे या वर्षी कापूस लागवडीत घटेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

 माहिती स्त्रोत- ॲग्रोवन

 

English Summary: Cotton cultivation is likely to decline this year due to price uncertainty
Published on: 08 April 2021, 09:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)