News

पुणे: ऑक्टोबर २०१९-२० पासून देशातील कापूस उत्पादनाचा हंगाम सुरू झाला. या हंगामादरम्यान कापसाचे उत्पादन ३५४.५० लाख गाठी राहिल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑप इंडिया (CAI) ने वर्तवला आहे. कापसाची एक गाठी ही १७० किलोग्रामची असते. असोसिएशनकडून वर्तविण्यात आलेला अंदाज हा कृषी मंत्रालयाने वर्तवलेल्या उत्पादनापेक्षा जास्त आहे.

Updated on 11 March, 2020 11:08 AM IST


पुणे:
  ऑक्टोबर २०१९-२० पासून देशातील कापूस उत्पादनाचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामादरम्यान कापसाचे उत्पादन ३५४.५० लाख गाठी राहिल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑप इंडिया (CAI) ने वर्तवला आहे. कापसाची एक गाठी ही १७० किलोग्रामची असते. असोसिएशनकडून वर्तविण्यात आलेला अंदाज हा कृषी मंत्रालयाने वर्तवलेल्या उत्पादनापेक्षा जास्त आहे.

कृषी मंत्रालयाने देशातील कापसाचे उत्पादन ३२२.७ लाख गाठी राहिल, असा अंदाज वर्तवला आहे. २०१८-१९ या वर्षातील पीक हंगामातील कापूस उत्पादन २८७.१ लाख गाठी होते. सीएआयनुसार, ऑक्टोबर २०१९ ते जानेवारी २०२० च्या दरम्यान कापसाचा एकूण पुरवठा २३.८९ लाख गाठी राहिला. यात ३१ जानेवारी २०२० पर्यंत १९२.८९ लाख गाठी इतका कापसाचा पुरवठा राहिला. तर  १० लाख कापसाच्या गाठीचे आयात करण्यात आले. तर चालू सत्रात कापसाचा ३२ लाख साठा हा बाकी राहिल,असा अंदाज आहे.

आधी हा साठा २३.५० लाख गाठी राहिल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. वर्षाच्या आढावा पत्रकानुसार चालू कापूस सत्राच्या शेवटपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कापसाचा एकूण पुरवठा हा ४११.५० लाख गाठी राहिल. पुर्ण पीक वर्ष म्हणजे ३० सप्टेंबर २०२० पर्यंत देशातील वापर ३३१ लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे. वापराचा हा आकडा कापूस सल्लागार मंडळाद्वारे २८ नोव्हेंबर २०१९ला वर्तवण्यात आल्याप्रमाणे राहिला. चालू सत्रात सीएआयने कापूस निर्यातीचा अनुमान ४२ लाख गाठी राहिल, असे सांगितले आहे. हा अनुमान मागील वर्षा इतकाच आहे.

English Summary: cotton crop estimate will 354.5 lakh bales in 2019-20 - CAI
Published on: 11 March 2020, 11:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)