News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊसदरावरून राजकीय वातावरण तापले आहे. राजू शेट्टी याबाबत आक्रमक झाले आहेत. रंगराजन समितीच्या अहवालानुसार एफआरपी आधारभूत किंमतीवर घोषित केली जाते 9.5 टक्के ऊसाच्या रिकव्हरीचा बेस आता 0.75 टक्क्यांनी वाढवून म्हणजेच 10.25 टक्के करण्यात आला आहे.

Updated on 10 November, 2022 9:54 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऊसदरावरून राजकीय वातावरण तापले आहे. राजू शेट्टी याबाबत आक्रमक झाले आहेत. रंगराजन समितीच्या अहवालानुसार एफआरपी आधारभूत किंमतीवर घोषित केली जाते 9.5 टक्के ऊसाच्या रिकव्हरीचा बेस आता 0.75 टक्क्यांनी वाढवून म्हणजेच 10.25 टक्के करण्यात आला आहे.

या बदलामुळं शेतकऱ्यांचा महसूल कमी झाला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याच्या अनुकूल धोरणात्मक निर्णयामुळं भारतीय साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. ज्यामुळं इथेनॉल आता ऊस प्रक्रियेचे अंतिम उत्पादन बनत आहे. पण साखर कारखानदार हा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाटून देण्यास तयार नाहीत.

यामुळे याबाबत राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका मांडला आहे. सध्या ऊस लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात साखर उद्योगाकडून शेतकर्‍यांचे शोषण केले जात असल्याचे शेट्टी म्हणाले. यामुळे शेतकऱ्याना हे पैसे मिळाले पाहिजेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपीमध्ये (FRP) वाढ करावी, अशी मागणी त्यांनी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजयपॉल शर्मा (Vijay Pal Sharma) यांच्याकडे केली.

सोयाबीन, ऊस, हरभरा या पिकातील सुरवातीपासून तणांची चिंता संपली

सध्या इथेनॉलचे उत्पादन ग्रहीत न धरल्यानं सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, आपण केलेली मागणी ही योग्य असून या धोरणामध्ये बदल करण्यासाठी शुगर केन कंट्रोल ॲार्डरमध्ये दुरूस्ती करावी लागणार आहे. याकरता मी स्वत: याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे शिफारस करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिलासा!लम्पीमुमृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंची नुकसान भरपाई खात्यावर जमा

अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत, साखर उद्योगाकडून शेतकर्‍यांचे शोषण केले जात आहे. यामुळे आता संघर्ष करावा लागणार आहे, शेट्टी याबाबत राज्यात ऊस परिषद घेऊन शेतकऱ्यांची मोट बांधत आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
मालदांडी ज्वारीला 5001 रुपयांचा दर
भारतीय अन्न आणि कृषी, जगाचे पॉवरहाऊस
उसाचे वजन आता मोफत करून मिळणार, काटामारीमुळे नेता उतरला मैदानात..

English Summary: 'Cost sugarcane cultivation increased, exploitation farmers sugar industry'
Published on: 10 November 2022, 09:54 IST