संपूर्ण जगात कोरोना (Corona) नामक महामारीने गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवून ठेवला आहे. देशात गेल्या काही दिवसापासून दुसरी लाट मागे ओसरताना दिसत आहे, मात्र असे असले तरी कोरोनाचे रुग्ण अनेक राज्यात झपाट्याने वाढत आहेत, कोरोना समवेतच देशात कोरोनाचा नवीन व्हेरीयंट ओमीक्रोन (The new variant of the Corona is the Omicron) देखील हळूहळू देशात पाय पसरू लागला आहे, आणि आता एक धक्कादायक बातमी जगासमोर येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की, चीनमध्ये ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाविषाणू आढळला आहे (Coronavirus has been found in dragon fruit in China). चीनमध्ये ड्रॅगन फ्रुट हे वियतनाम मधून आयात केले जातात. ड्रॅगन फ्रुट मधून कोरोनाविषाणू पसरत असल्याची बातमी चीनमध्ये पसरल्या बरोबर अनेक सुपर मार्केटला कुलूप लावण्यात आले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की चीनच्या झेजी्यांग आणि जिआंगशी (Zhejiang and Jiang'shi) ह्या चिनी प्रांतात सुमारे नऊ शहरांतील ड्रॅगन फ्रुटची तपासणी केली गेली, तपासणीत ड्रॅगन फ्रुट मध्ये कोरोनाचे विषाणू आढळल्याचे नमूद करण्यात आलेत. ड्रॅगन फ्रुटमध्ये कोरोनाचे विषाणू आढळल्याने तेथील नागरिकांमध्ये लक्षणीय भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तेथील प्रशासनाने फळ खरेदी करणाऱ्या व्यक्तींना तसेच फळ विक्री करणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची सक्ती केली आहे. चीनमध्ये आता प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची सखोल चौकशी केली जात आहे.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वियतनाम ड्रॅगन फ्रुट आयात केला जातो (Vietnam Dragon Fruit is widely imported into China) कोरोना विषाणूची ड्रॅगन फ्रुट मध्ये पुष्टी झाल्यानंतर चीन सरकारने ड्रॅगन फ्रुटच्या आयातीवर पूर्णतः बंदी घातली आहे. पुढचे आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार असे समोर देखील येत आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी चीनमध्ये हे प्रकरण समोर आले आहे, तेव्हापासून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमध्ये कोरोनाविषाणू (Coronavirus) आधीच आपले पाय पसरताना दिसत आहे आणि आता ही बाब समोर आल्याने चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवाय चीन मधील शिवान शहरात मोठ्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यामुळे शिवान शहरात लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे, आणि ड्रॅगन फ्रुट मधून कोरोना विषाणू पसरतो हे समजल्यापासून युझू उशिरा देखील लॉकडाऊन लावण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये कोरोनाविषाणू सापडल्याची पुष्टी झाल्यानंतर संपूर्ण जगातील लोकांमध्ये भिती बघायला मिळत आहे. तसेच हा विषय डॉक्टरांसाठी, वैज्ञानिकांसाठी देखील डोकेदुखीचा सबब ठरू शकतो. कारण याआधी कोरोना विषाणू अन्नपदार्थात कधीच आढळला नव्हता.
Published on: 06 January 2022, 06:17 IST