कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या मोहिमेच्या अंमलबजावणीची देशभरात रंगीत तालीम घेण्याची तयारी केली आहे. उद्या म्हणजे २ जानेवारीला ही तालीम केली जाणार आहे. याआधी पंजाब, आसाम, गुजरात, आणि आंध्रप्रदेशात रंगीत तालीम झाली होती.
या चारही राज्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर देशभरात रंगीत तालीम घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना लस वापरासाठी मंजुरी मिळताच देशभरात लसीकरण सुलभतेने करता यावे,यासाठी ही तालीम असून यामध्ये सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात तीन केंद्रावर ही मोहीम राबवली जाईल, अर्थात शहरी भागाप्रमाणेच राज्यामधील दुर्गम भागातील आणि आरोग्य सुविधा समाधानकारक नसलेल्या जिल्ह्यांमध्येदेखील लसीकरणाची पूर्वतयारी केली जाईल.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या प्रस्तावित रंगीत तालमीसाठी राज्यांसमवेत बैठक घेतली. यात राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिवांसोबतच राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक आणि अन्य अधिकारी देखील सहभागी झाले होते.
लसीकरणाच्या आपत्कालीन परवानगी देण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फायजर आणि भारत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या लस उत्पादक कंपन्यांच्या मागणीवर आज विचार विमनिय झाला. या बैठकीनंतर आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी दोन जानेवारीला रंगीत तालीम घेण्याचा निर्णय केला. दरम्यान, पूर्व तयारी बाबत उद्या आणखी एक बैठक होणार असल्याचेही कळते. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लस वितरणासाठी प्रत्येक राज्यामध्ये किमान तीन केंद्रे निश्चित केली जातील, याठिकाणी लाभार्थींना नोंदणी करता.
तत्पुर्वी सर्वसाधारण लसीकरण मोहिमेप्रमाणेच ही रंगीत तालीम घेतली जाणार असून केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार राज्यांना दोन शहरे निवडावी लागतील. या शहारांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविणे, लस रुग्णालयापर्यंत नेऊन रुग्णांना डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
यामध्ये शीतपेट्यांमध्ये लसीची साठवणूक, लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थीची नोंदणी, लस दिल्यानंतरचा वैद्यकीय सल्ला या प्रक्रियांचाही समावेश असेल.
Published on: 01 January 2021, 02:00 IST