News

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता, उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पीएमओने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान देशात विषाणूचा विळखा वाढत चालला आहे.

Updated on 13 April, 2020 4:36 PM IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात  २१ दिवसांचा  लॉकडाऊन करण्यात आला होता, उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे.  याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान उद्या सकाळी १०  वाजता देशाला संबोधित करणार आहेत.  पीएमओने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान देशात विषाणूचा विळखा वाढत चालला आहे.  काल परवा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक झाली यात अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची विनंती केली आहे.

दरम्यान  गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ९०९ नवे रुग्ण आढळले असून ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या १,९८५ इतकी झाली असून २४ तासांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १६ जण मुंबईतील आहेत. दरम्यान देशातील कोरोना बाधितांची संख्या ९ हजार १५२ झाली आहे, तर मृत पावणाऱ्यांची संख्या ३०८ झाली आहे. साधारण ८५६ जण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली. गेल्या गेल्या पाच दिवसांमध्ये सरासरी १५,४४७ नमुना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ५८४ नमुने बाधित होते.

दरम्यान दिल्लीत भाजीपाला बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याने एक निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत घाऊक बाजारपेठांमध्ये भाज्या सकाळी सहा ते ११ या वेळेत मिळतील तर फळे दुपारी दोन ते संध्याकाळी सहा या वेळेत मिळतील. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाळ राय यांनी ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वेगवेगळया बाजारपेठांमध्ये अजूनही गर्दी होत आहे.

मागील अपडेट - 
महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची तयारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शवली आहे.  लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.  या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची तयारी दाखवली. तसेच याबाबत केंद्र सरकारने यासाठी मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.  दरम्यान शुक्रवारीही राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने द्विशतक गाठले.  एकूण रुग्णांचा आकडा तब्बल १ हजार ५७४ वर पोहोचला आहे.  राज्यात शुक्रवारी २१० नव्या रुग्णांची नोंद झाली.

यापैकी १३२ रुग्ण हे मुंबईतील असून पुण्यात ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शुक्रवारी राज्यात १३ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला. पैकी १० मृत्यू हे मुंबईतील आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ११० वर गेला आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अशी आहे राज्यातील नवीन  आकडेवारी -
मुंबई १००८, ठाणे ३, ठाणे मनपा २८, नवी मुंबई ३२, कल्याण डोंबिवली ३४, उल्हासनगर १, मीरा-भाईंदर २१, पालघर ३, वसई विरार १२, पनवेल ६, नाशिक मंडळ ३४, पुणे मंडळ २५४, कोल्हापूर मंडळ ३७, औरंगाबाद मंडळ १९, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ३४, नागपूर मंडळ २६ इतर राज्ये ९.

मागील अपडेट -
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा गुरुवारी धक्कादायकरीत्या वाढला आहे.  प्रथमच एका दिवसात नव्या रुग्णांची संख्या २२९ झाली आहे.  राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १३६४ वर पोहोचला आहे.  तर राज्यातील मृतांचा आकडा ९७ वर गेला आहे.  सध्या १,१४२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.  देशात आतापर्यंत देशात ६ हजार ४१२ जण बाधित झाले असून  ५०३ कोरोना मुक्त  झाले आहेत.  तर १९९ जणांचा मृत्यू झाला आहे.  गुरुवारी राज्यात एकूण २५ कोरोनाबाधितांचा मृत्यूची नोंद झाली.  यापैकी १४ मृत्यू पुण्यातील आहेत, ९ मुंबई, मालेगाव, रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  मुंबईत एका १०१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे राज्यातील आकडेवारी

मुंबई ८७६, पुणे १८१, पुणे ग्रामीण ६, पिंपरी-चिंचवड १९, सांगली २६, ठाणे २६, कल्याण-डोंबिवली ३२, नवी मुंबई ३१, मीरा-भाइंदर ४, वसई-विरार ११, पनवेल मनपा ६, ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण प्रत्येकी ३, सातारा ६, नागपूर १९, नगर १६, बुलडाणा ११, नगर ग्रामीण ९, औरंगाबाद १६, लातूर ८, अकोला ९, मालेगाव ५, रत्नागिरी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती प्रत्येकी ४, कोल्हापूर ५, उल्हासनगर, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी १ आणि इतर राज्ये ८.

मागील अपडेट- राज्यात बुधवारी कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.  महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे.   महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या ११३५ वर पोहचली आहे.  परंतु आपण वेळेत निर्णय घेतल्यानं करोनाचा गुणाकार थांबला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  पण राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे.  तो सरासरी मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.  त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.  तथापि, ही तिसरी स्टेज नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.  देशात कोरोना बाधितांची संख्या ही ५ हजार ७३४ झाली असून १६६ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर ४७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  दरम्यान १५ तारखेनंतर लॉकडाऊन पुर्ण संपणार नसल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.

मागील अपडेट - 
राज्यावर कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. मंगळवारी एका दिवसात १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.  पैकी ११६ रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत.  राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १०१८ वर गेला आहे. तर देशातील रुग्णांची संख्या ५ हजार १९४ झाली आहे.  तर १४९ जणांचा मृत्यू झाला आहे.   क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात १२ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण झाले आहे.  कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता मुंबई आणि पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढू शकतो.

पुण्यात १८, नगर ३, बुलडाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी, सांगली प्रत्येकी १ अशा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ मुंबई, ३ पुणे आणि नागपूर, सातारा, मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बळींचा आकडा ६४ वर पोहोचला आहे.  दरम्यान पुण्यातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या परिसरामध्ये  कर्फ्यू लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.  कर्फ्यू लागू झाल्यानंतर या भागातील लोक कोणत्याही कारणास्तव घराच्या बाहेर पडू शकणार नाहीत.  फक्त सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासांच्या कालावधीत लोक गरज पडल्यास जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर येऊ शकतील.

मागील अपडेट - 
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून  सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली.  यामुळे सरकार चिंतेत पडले आहे.    महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहोचली आहे.  पुर्ण देशातून ३५४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.  दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकाडा झपाट्याने वाढत असल्याने बोलले जात आहे.  या पार्श्वभूमीवर सोमवारी देसाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५ हजार लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईत ५७ नव्या कोरोना (Covid-19) बाधित आढळून आले. मुंबई ५२६, पुणे (शहर व ग्रामीण) १४१, सांगली २५, ठाणे मंडळ ८५, नगर २३, नागपूर १७, औरंगाबाद १०, लातूर ८, बुलडाणा, सातारा प्रत्येकी ५, यवतमाळ ४, उस्मानाबाद ३, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, नाशिक प्रत्येकी २, सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती, हिंगोली, जालना प्रत्येकी १, इतर राज्य २.  दरम्यान देशभरातून ४ हजार ४२१ जण () कोरोनाबाधित आहेत. तर ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२६ जण यातून बरे झाले आहेत.  कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला बळकटी देण्यासाठी अनेक जण मदत करत आहेत. खासदरांनी एका वर्षासाठी आपल्या वेतनातून ३० टक्के कपात केली आहे.

मागील अपडेट - 
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळापर्यंत ७४९ वर गेली आहे. रविवारी एका दिवसात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु ओढावला. यातील ८ मृत एकट्या मुंबईतील असून ३ मृत पुण्याचे तर प्रत्येकी १ मृत कल्याण, डोंबिवली आणि औरंगाबादचा आहे. यासंह राज्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा ४५ इतका झाला आहे. शनिवारी राज्याची कोरोना बाधित रुग्ण संख्या ६३५ इतकी होती. रविवारी ती ७४८ वर गेली. रविवारी ११३ रुग्ण नव्याने सापडले असून ही संख्या आजपर्यंतची सर्वाधिक आहे. ४६ हजार ५८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ८३७ संशयितांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण ५६ कोरोना बाधित रुग्णांना बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहे. दरम्या देशात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार झाली आहे. 

मागील अपडेट- 
राज्यात शुक्रवारी ६७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ४३ रुग्ण मुंबई , १० मुंबई परिसर, पुणे ९ व नगरच्या ३ रुग्णांसह वाशीम, रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ५३६ वर गेली. शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत पावणाऱ्यांचा आकडा २७ झाला आहे. देशभरात या विषाणूने मृत पावणाऱ्यांची संख्या ६८ झाली आहे. तर २९०२ जणांना लागण झाली आहे. डॉक्टर आणि नर्सेस (परिचारिकांबरोबर) गैर व्यवहार करणाऱ्यांना शिक्षा  केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मागील अपडेट - 
कोरोना विरुद्धातील भारताच्या लढाईला जागतिक बँकेची साथ लाभली आहे.  जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. करोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताला सात हजार ५०० कोटींचा (१०० कोटी डॉलर) आप्तकालीन निधी देण्यास मंजूरी दिली आहे.  राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी एका दिवसात राज्यात तब्बल ८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ४२३ वर गेली आहे.  देशात आतापर्यंत २ हजार ६३९ जणांना याची लागण झाली आहे.  राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४२ जण बरे झाले आहेत.  गुरुवारी मुंबई व परिसरात सर्वाधिक म्हणजे ६३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.  या दरम्यान लॉकडाऊनमधील एक बातमी हाती आली आहे.  किराणा दुकान आणि मेडिकलची दुकाने आता १२ तास उघडी राहणार आहेत.  लॉकडाउन दरम्यान किराणा दुकान आणि मेडिकलवर गर्दी वाढत होती,  सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले जात नव्हते. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता.

मागील अपडेट -
राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३८ झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.  चिंतेची बाब म्हणजे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार, देशात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांमध्ये २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण १ टक्का अधिक आहे. या विषाणूमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या ५० झाली आहे. देशात एकूण २ हजार ९७ रुग्ण कोरोना बाधित आहेत. दरम्यान १७१ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

 मागील अपडेट -देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १७१६ जण कोरोनाग्रस्त आहेत, त्यापैकी राज्यातून ३२५ जण कोरोनाबाधित आहेत. महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. मंगळवारी कोविड-१९चे ७२ नवे रुग्ण आढळून आले. याच दरम्यान एक चांगली बातमी हाती आली आहे. १५० जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 

मागील अपडेट - दिल्लीमध्ये गेल्या काही तासांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तब्बल २० हजार घरे क्वारंटाइन केल्याची माहिती दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी दिली. तसंच त्यांनी पोलिसांना या घरावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासही सांगितले आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आतापर्यंत २५० जण बाधित झाले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण आढळले आहेत.  राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५० वर गेली आहे.  मुंबईत ३८, पुणे ५, नागपुरात २ व नाशिक, कोल्हापूर येथील प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या १० झाली आहे.  दरम्यान कोरोनातून बरे झालेले ३९ जणांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २५१ झाला आहे.  दरम्यान कोरोना व्हायरसविरुद्धात लढा देण्यासाठी अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत. 

मागील अपडेट - कोरोनाच्या विळख्यात पू्र्ण देश अडकला असून  राज्यासह देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे.  दरम्यान या आजाराच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले  आहे.  समोर येणारे आकडे आपल्याला अजून काही दिवस घरीच बसण्यास सांगत आहेत.  राजधानी दिल्लीत रविवारी म्हणजे एकाच दिवशी २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर महाराष्ट्रात दोघांचा मृत्यू झाला. देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २४ झाली असून, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९६ जणांची प्रकृती बरी झाल्याने घरी सोडण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशभरात करोनाचा फैलाव वाढताना दिसतो आहे. कारण एक दिवसात संपूर्ण देशात ८८ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.  त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ६९४ वर गेली आहे. तर करोनामुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.  गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये तीन मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहचली आहे.  गुरुवारी पाच रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातलीही करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तर कर्नाटकात दोघांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचाल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला. लोकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे सरकारने वारंवार केले आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना एक दिलासादायक बातमी हाती आली आहे.  काल कोरोनाचे दोन रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परत गेले. रोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असताना बुधवारी मात्र ही संख्यादेखील तीनने कमी झाली.  मंगळवारी १८ रुग्ण आढळले होते ती संख्या आज १५ वर आली आहे. पंतप्रधान यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनला यश येताना दिसत आहे.  कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.  इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याविषयीची आकडेवारी दिली आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढली. तर मंगळवारी हा आकडा ६७ ने वाढला होता. दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२३ झाली आहे.

भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून ५३६ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ११ लोकांनी या व्हायरसमुळे आपला जीव गमावला आहे. आज तमिळनाडूतील मदुरईमद्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काल मुंबईमध्ये एका व्यक्तीचा तर दिल्लीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. एकूण ५३६ जणांमध्ये ४७६ जण भारतीय नागरिक आहेत. तर ४३ जण विदेश नागरिक आहेत.

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही संख्या ११२ झाला आहे. या दरम्यान एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे ४० जणांना कोरोनामुक्त झाले आहे. महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आले आहे. पुण्यातील हे दाम्पत्य दुबईहून आले होते. हे दाम्पत्य महाराष्ट्रातील पहिले कोविड-19 चे रुग्ण होते. नायडू हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात होते.

English Summary: Corona virus update : tomorrow pm modi will address to nation ; 1,985 case in Maharashtra
Published on: 17 March 2020, 05:48 IST