News

करोना व्हायरस (Corona Virus) महामारीमुळे भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर करोना बाधितांची संख्या १२, हजार ३८० झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Updated on 16 April, 2020 10:04 AM IST


कोरोना व्हायरस (corona virus) महामारीमुळे भारतामध्ये आतापर्यंत ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर करोना बाधितांची संख्या १२ हजार ३८० झाली आहे.  गेल्या २४ तासांमध्ये भारतामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाल्यामुळे भारतामध्ये चिंतेचे वातावरण आहे.  यापैकी १४८९ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.  तर १० हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान  देशभरात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही घोषणा केली. लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

भारतामध्ये १२३ जिल्ह्यात १७० कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत.  महाराष्ट्रात बुधवारी २३२ कोरोना रुग्ण वाढले असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ९१६ वर गेली आहे.  बुधवारी  ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  यापैकी मुंबईत २, पुण्यात ६ आणि अकोल्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.  बुधवारी झालेल्या ९ मृत्यूंपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत. ३ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. दोघे ४० वर्षांखालील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७ वर गेली आहे. दरम्यान दिल्ली-मुंबईमध्ये सर्वाधित चिंतेचे वातावरण आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये   कोरोनाबाधितांची  संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे.

कोरोना चाचण्याची संख्या वाढणार-
देशातील कोरोनाच्या चाचण्या लवकर व्हाव्यात यासाठी भारताने चीनकडून चाचणीसाठी सामग्री मागवली आहे. चीनकडून ही सामग्री आज भारतात पोहोचू शकते. या किट्समुळे Covid-19 च्या चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे. चीनमधून सामनाची पहिली खेप येणार आहे. त्यामध्ये तीन लाख रॅपिड टेस्टिंग किट्स असणार आहेत. पुढच्या दोन आठवडयात चीनमधून असे आणखी २० ते ३० लाख किट्स भारतात पाठवण्यात येतील. याबाबतीत टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी
मुंबई १८९६, ठाणे १२, ठाणे मनपा- ९७, नवी मुंबई ६८, कल्याण-डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी-निजामपूर १, मीरा-भाईंदर ५१, पालघर ५, वसई- विरार ३२, रायगड ५, पनवेल १०, नाशिक मंडळ ८३, पुणे मंडळ ४१५, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ २५, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ४६, नागपूर ५६.

English Summary: Corona Virus Update : 12 thousand case in india; number increased in Maharashtra
Published on: 16 April 2020, 10:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)