कोरोना व्हायरसने देशात थैमान घातले असून या महामारीने सर्वांना हतबल केले आहे. यामुळे आज रात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीॉंनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर असे समोर आले आहे, एकमेव उपाय त्यावर त्यावर प्रभावी आहे. एकमेकांपासून दूर राहणे हाच उपाय आहे.
कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या संक्रमणाचे चक्र तोडयलाच हवे. सोशल डिस्टंस केवळ रुग्णांसाठीच नाही तर प्रत्येकांसाठी गरजेचा आहे. पुर्ण देश संकटात सापडला आहे. बेजबाबदारपणा असाच रहिल्यास भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची वेळ मी मागत आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊन करत आहे, पुढील २१ दिवस लोकांनी घरातच थांबावे , ही कर्फ्यूसारखी स्थिती आहे. याला सहकार्य करावे, असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
Published on: 24 March 2020, 09:16 IST