News

करोना व्हायरसचा व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. चीननंतर जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे व्यापार ठप्प पडले आहेत. या व्हायरसचा परिणाम हापूस आंब्याच्या निर्यातीवर झाला असून शेकडो टन हापूस आंबा बाजारात पडून आहे. करोनाच्या धास्तीने आखाती देशांनी हापूस आंब्याची निर्यात थांबवली आहे.

Updated on 12 March, 2020 5:16 PM IST


करोना व्हायरसचा व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. चीननंतर जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे व्यापार ठप्प पडले आहेत. या व्हायरसचा परिणाम हापूस आंब्याच्या निर्यातीवर झाला असून शेकडो टन हापूस आंबा बाजारात पडून आहे. करोनाच्या धास्तीने आखाती देशांनी हापूस आंब्याची निर्यात थांबवली आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे करोनाचा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. आता सध्य बाजारात आंब्याची पेटी ६ हजार रुपयांना विकली जात आहे. परंतु करोनामुळे पेटीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

वाशी मार्केटमध्ये दररोज ४ हजार आंब्याच्या पेटी येत असतात. मात्र निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेकडो टन आंबा पडून आहे. दरम्यान भारतात १.८७ कोटी लाख टन आंब्याचे उत्पादन घेतले जाते. आंब्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ४१ टक्के इतका आहे. जगातील ५० देशांमध्ये आंब्याची निर्यात केली जाते. देशातील आंबा उत्पादनात महाराष्ट्र पहिला नाही. पण आंब्याच्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात आंब्याच्या लागवडीखालील क्षेत्र पाच लाख ६६ हजार हेक्टर आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

English Summary: corona virus effect on alphonso mango
Published on: 12 March 2020, 05:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)