News

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात (In Malegaon taluka of Nashik district) सध्या कोरोनाचा विस्फोट बघायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र कोरोना आणि कोरोनाच्या नव्या वेरिएंट ओमिक्रोनमुळे हाहाकार माजलेला आहे (The new variant of the Corona, Omicron, is causing havoc). नाशिक जिल्ह्यात परिस्थितीही आवाक्याबाहेर जातांना नजरेस पडत आहे. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शासन दरबारी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील प्रशासनाद्वारे कडक निर्बंध (Strict restrictions) लादण्यात येत आहेत, नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी (Guardian Minister Hon'ble Chhagan Bhujbal Saheb) जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated on 11 January, 2022 11:47 AM IST

दहावी व बारावी हे दोन वर्ग सोडून जिल्ह्यातील शाळांना कुलूप लावण्यात आले (Schools were locked) आहे, मात्र असे असले तरी ऑनलाईन पद्धतीने या वर्गांचे क्लासेस घेतले जाणार आहेत. मालेगाव तालुक्यात देखील कोरोनाचा उद्रेक (Outbreak of corona) होतांना दिसत आहे, मात्र असे असले तरी तालुक्यातील नागरिक बेभान आहेत. शहरात अद्यापही नागरिक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. नागरिकांच्या या बेजबाबदार वागण्याने तालुक्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मालेगाव शहरात व ग्रामीण भागात (In Malegaon city and rural areas) कोरोना हळूहळू आपले पाय पसरविताना दिसत आहे. 

सोमवारी एकाच दिवसात मालेगाव मध्य व बाह्यमध्ये मिळून एकूण 31 कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. सोमवारचे 31 रुग्ण धरून मालेगाव शहर व ग्रामीण भागात आता एकूण 68 कोरोना रुग्ण सक्रिय (Corona patient active) आहेत. या 68 रुग्णांपैकी ग्रामीण भागात तब्बल 17 रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात देखील कमालीचे भितीचे वातावरण तयार झाले आहे. रविवार पर्यंत मालेगाव तालुक्यात कोरोना हा नगण्य स्वरूपात होता, रविवारी मालेगाव शहरात 27 तर मालेगाव ग्रामीण भागात अवघे 12 रुग्ण होते. मात्र सोमवारच्या दिवशी झालेल्या या कोरोना विस्फोटमुळे प्रशासनाची (Of administration) चिंता अजूनच वाढली आहे. 

संपूर्ण राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 संचारबंदी लावण्यात आली आहे मात्र शासनाच्या या निर्बंधाला सामान्य नागरी जुमानत नाहीय. शासनाला यासाठी अजून काहीतरी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची rt-pcr टेस्ट करावी, तसेच लवकरात लवकर तालुक्यात निर्माण झालेला कोरोना विस्फोटचा बीमोड करावा अशी मागणी केली जात आहे. मालेगावी तयार झालेला हा कोरोना विस्पोट किती त्रासदायक सिद्ध होऊ शकतो हा तर येणारा काळच सांगेल.

English Summary: corona spreading tremendously in malegaon people in fear
Published on: 11 January 2022, 11:47 IST