गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी आटोक्यात राहण्याठी सरकारने पुन्हा निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. कोरोना निर्बंधामुळे पोल्ट्री व्यवसयावर परिणाम होत आहे. पोल्ट्री व्यवसायिक संकंटात सापडला आहे.
शेतीला जोडधंदा असलेला पोल्ट्री व्यवसाय ‘कोरोना’ व्हायरसमुळे चांगलाच संकटात सापडला आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे अंडी आणि चिकनच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. निर्बंधामुळे बाजारपेठा लवकर बंद होत आहेत. लोक घराबाहेर कमी येत आहेत. म्हणूनच विक्री कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांत घाऊक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किंमती 30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. दिल्ली लगतच्या भागातील किरकोळ बाजारात आता एक अंड 6-7 रुपयांना मिळत आहे. त्याचप्रमाणे किरकोळ बाजारातील चिकनेचे दर हे 180 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आले आहेत.
अशा असणार आहेत अंड्याच्या सुधारित किंमती
अंडी समन्वय समितीने जाहीर केलेल्या किंमतीनुसार नवीन वर्षात सलग 11 व्या दिवशी अंड्यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. दिल्लीच्या बाजारपेठेत 500 रुपयांना 100 अंडी तर दुसरीकडे हैदराबादमध्ये 440 रुपयांना शेकडा अंडी मिळत आहेत. तर घाऊक बाजारात चिकन 90 ते 120 रुपये किलोदराने उपलब्ध आहे. सध्या मुंबई आणि उत्तर प्रदेशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अंड्यांची सर्वाधिक मागणी आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि लखनौमध्ये 533 रुपयांना एक शेकडा अंडी मिळत आहेत.
खाद्य दरात दुपटीने वाढ
एकीकडे अंडी आणि चिकनच्या किंमतीमध्ये घट होत आहे. मात्र, दुसरीकडे खाद्य दरात दुपटीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीन दर स्थिर आहेत, तरी मक्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने मका 2 हजार रुपयेच क्विंटल पडत आहे. यामुळे एकीकडे कोंबडी आणि अंड्याचे दर कमी होत असताना दुसरीकडे त्यांच्या खाद्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी कमी पाण्यावर चालणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय केला जातो. भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना या विषाणूने ग्रासले असून परिणामी पोल्ट्रीचालक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मागणी झपाट्याने कमी झाली आहे. एक किलो चिकनची किंमत 120 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंड्यांवर सर्वात मोठा परिणाम झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात चिकनच्या आणि अंड्याच्या दरात वाढ होईल अशी आशा पोल्ट्रीधारकांना आहे.
ग्रामीण भागातील सुशिक्षित, बेरोजगार तरुण आज शेतीपुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत. लाखो रुपयांचे बॅंकांचे कर्ज घेऊन हे व्यवसाय त्यांनी उभारले आहेत. पण हा व्यवसाय अडचणीत पुन्हा कोरोनाच्या भीतीने संकटात सापडला आहे. याची राज्य शासनाने तातडीने दखल घ्यावी व शासनाच्या पशुवैद्यकीय कुक्कुटपालन विभागामार्फत जनजागृती करून पोल्ट्री व्यावसायीकांना दिलासा देवून प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांकडून होत आहे.
Published on: 12 January 2022, 05:40 IST