मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे बरेचसे निर्बंध शितील करण्यात आले होते. परंतु कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि डेल्टा प्लस या कोरोना च्या नव्या प्रकारामुळे राज्य शासनाने पुन्हा राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सोमवारी आज पासून जुने नियम नव्याने लागू जाणार आहेत.
मागील काही महिन्यांमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. परंतु मागील काही महिन्यापासून रुग्ण संख्येत घट झाल्याने सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली होती. जिल्ह्यानुसार पाच टप्पे करून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
परंतु आता कोरोना च्या तिसऱ्या लाट्या चा इशारा आणि डेल्टा प्लस या विषाणूच्या नव्या प्रकारामुळे काही रुग्ण आढळल्याने या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आजपासून कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी रुग्णसंख्या, संसर्ग दर, प्राणवायू च्या उपलब्ध काटा या आधारे शहरे आणि जिल्ह्यांची श्रेनी रचना दर आठवड्याला निश्चित केली जात होती. गेल्या तीन आठवड्यांपासून पाच स्तरीय रचनेनुसार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र या अनलॉक काळात नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याने कोरोना चे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसले. म्हणून या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चार जूनचे आदेश लागू केले जात आहेत. सध्या पहिल्या आणि दुसर्या स्तरातील जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या स्तरात होईल. रुग्ण संख्या, संसर्ग दर त्याचा आढावा घेऊन महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्यांना निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार दिले आहेत.
काय सुरु काय बंद राहील
- सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी चार पर्यंतच खुली राहतील.
- अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने शनिवार आणि रविवारी बंद राहतील.
- मॉल्स, चित्रपटगृहे पूर्णपणे बंद राहते.
- सायंकाळी 5 नंतर संचारबंदी असेल. ( अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा अपवाद )
- उपाहारगृहे दुपारी चारपर्यंत 50% क्षमतेने, नंतर घरपोच सेवा सुरू राहील.
- स्तर चार व पाच मधील जिल्ह्यांमध्ये उपहार गृहा मधून घरपोच सेवा दिली जाईल.
- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 100% आसन क्षमतेने, पण उभे राहून प्रवास करण्यास मनाई
- सकाळी पाच ते नऊ सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागांमध्ये व्यायाम, चालणे किंवा सायकल चालवण्यास परवानगी
- खाजगी कार्यालय दुपारी 4 पर्यंत 50% क्षमतेने चालू राहतील.
- केशकर्तनालय, ब्युटी पार्लर दुपारी चारपर्यंत 50% क्षमतेने सुरू राहण्यास परवानगी
- चित्रीकरणासाठी सारे निर्बंध पाळून सायंकाळी पाच पर्यंतच परवानगी
- सांस्कृतिक कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेत दुपारी चार पर्यंत परवानगी शनिवार व रविवार बंद
- विवाह समारंभांना फक्त पन्नास लोकांना, अंत्यसंस्काराला वीस लोकांनाच उपस्थितीची मुभा
- ई कॉमर्स मध्ये स्तर 3 मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, तर स्तर चार व पाच मध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील वस्तू वितरण
- व्यायाम शाळा 50% ते दुपारी 4 पर्यंत
Published on: 28 June 2021, 11:21 IST