देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन गेल्या काही वर्षीच्या तुलनेत राहण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने देशभरात लॉकडाऊन असल्याने देशांतर्गत बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
त्यातच देशात कोरोनाची स्थिती बिकट झाल्याने अनेक देशांनी आयात बंद केली आहे. त्याचा परिणाम सध्या दरावर झाला असला तरी दर कमी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली. देशात सध्या कोरोना उद्रेक झाला आहे, त्यामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्याचा परिणाम शेतीमालाच्या बाजारावर झाला आहे. काबुली हरभऱ्याला हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न - समारंभातून मोठी मागणी असते, मात्र कोरोनामुळे निर्बंध असल्याने या क्षेत्रातून मागी घटली आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणीवर परिणाम झाला आहे. दरात तेजी- मंदीची स्थिती नाही.
यासह आयातदार देशांनी कोरोनामुळे भारतातून आयात जवळपास थांबविली आहे. त्यामुळे दरातील तेजीला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. मात्र काबुली हरभऱ्याचे दर घसरण्याची शक्यता नाही, असे जाणकारांनी म्हटले आहे. सध्या सुदान देशातून छोटा काबुली हरभरा देशी काबुली हरभऱ्याच्या तुलनेत कमी दरात मिळत आहे. त्याचाही परिणाम देशातील हरभरा मागणीवर झाला आहे. मात्र कोरोना स्थिती निवळल्यानंतर बाजार पुन्हा पूर्वपदावर येईल आणि दरात तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या जगात भारत आणि कॅनडा या दोनच देशात काबुली हरभऱ्याची स्थिती ठीकठाक असल्याचे बोलले जाते.
सध्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मिळून ३.१५ लाख टन साठा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जागतिक पातळीवर भारत आणि कॅनडातूनच निर्यातीची शक्यता आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता असून दरही वाढतील, असे जाणकर सांगतात. देशातील बाजार समित्यांच्या कामकाजावर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे.
बाजार समित्यांत खरेदी- विक्रीचे व्यवहार नगण्य होत आहे. लॉकडाऊन मधून सरकारने यावेळी वाहतुकीला वगळले असले, तरी मालच येत नसल्याचा त्याचा लाभ होताना दिसत नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूसारख्या राज्यातील जास्त पुरवठा असणाऱ्या बाजार समित्या बंद आहेत किंवा व्यवहार कमी आहेत.
Published on: 12 May 2021, 06:43 IST