कोरोनामुळे देशसह पुर्ण जगाचे अर्थ गणित बिघडले आहे. अधिक संसर्ग होऊन नागरिकांचा जीव जाऊ नये यासाठी सरकारने देशा लॉकडाऊन लागू केले. परंतु या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर परिमाण झाला. अनेकांच्या रोजगार गेला, अनेक कारखाने बंद पडले आहेत, या स्थितीला रुळावर आणण्यासाठी आणि अर्थव्यवस्था व्यवस्थित रुळावर राहावी यासाठी केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्राताला मदत करत आहे. बऱ्याच ठिकाणची बाजारपेठ सुरु झाली आहेत, काही उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन सुरु केले आहे. पण अजून काही भाग रहिला असून तो अजून लॉकडाऊनच्या परिणामातून बाहेर आलेला नाही. यातील एक भाग म्हणजे आंबा विक्री, आंबा विक्रीतून दरवर्षी देशाला मोठा महसूल मिळतो.
परंतु यंदा मात्र आंब्याच्या बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे. यंदा आंबा बाजारपेठेतून येणारा महसूल २० ते ३० टक्क्यांनी खाली घसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लॉकडाऊनमध्ये घटलेली मागणी. नागरिक अधिक पैसा खर्च करण्यात तयार नाहीत, आपल्याकडील पैसा बाहेर काढण्यास नागरिक तयार नसल्याने अर्थ गणित थांबले आहे. दुसरं मोठं कारण म्हणजे , निर्यात बंद. साधरण दरवर्षाला भारतातून ५० हजार टन आंब्याची निर्यात होत असते. परंतु यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्यात बंद झाली आहे. दरम्यान निर्यातीत वाढ होण्यासाठी सरकार निर्यात करामध्ये सूट दिली आहे, पण याचा कोणताच सकारात्मक परिणाम हाती लागलेला नाही.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्यात तर कोरोनाबांधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. याचा परिमाण हा आंबा उद्योगावर झाला आहे. यंदाचे वर्ष आंबा उत्पादकांसाठी खूप वाईट गेले आहे, आंबा उत्पादकांना १५ ते २० किलो दराने आंबा विकावा लागत आहे. यामुळे हे वर्ष आंबा उत्पादकांना नुकसानकारी ठरले आहे, दराच्या समस्येसह शेतकऱ्यांना आंब्यावरील रोगराईचा मोठा फटका बसला आहे. यामुळे आंब्याचे उत्पादनही कमी झाले आहे.
Published on: 14 July 2020, 04:20 IST