चीनमधील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. पुन्हा एकदा जगाची चिंता चीनने वाढवली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा वेगाने कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक प्रांतामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
या दरम्यान, हाँगकाँगमधील एका रिपोर्टने चिंता अधिक वाढवली आहे. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, एका संशोधनानुसार, चीनमध्ये 20 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे चीन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत.
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, चीनमधील 1.41 बिलियन लोकसंख्येच्या आधारावर सुमारे 9,64,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होईल. हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी सांगितलं की, संशोधनानुसार चीनमधील सर्व प्रांतांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थोपवण्यात आणि संसर्गाचा सामना करण्यात आरोग्य प्रशासन असमर्थ ठरेल.
नुकसान भरपाईच्या रकमेत मोठी वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचे धडाकेबाज निर्णय
झिरो कोरोना धोरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन झाल्याने चीन सरकारने लॉकडाउन मागे घेतला खरा, पण आता स्थिती ढासळत असल्याचे चित्र आहे. बीजिंगसह अन्य शहरातील रुग्णालयात कोरेानाबाधितांची संख्या वाढत चालली असून वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाबाधित होऊनही ते रुग्णांवर उपचार करत आहेत.
सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकरांनी घेतली कृषिमंत्री तोमर यांची भेट
Published on: 16 December 2022, 09:15 IST