News

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये (China Covid Cases) मोठी वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी चीनमधून कोरोना सगळीकडे पसरला होता. यामुळे लॉकडाऊन घालण्यात आले होते.

Updated on 24 November, 2022 12:33 PM IST

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये (China Covid Cases) मोठी वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी चीनमधून कोरोना सगळीकडे पसरला होता. यामुळे लॉकडाऊन घालण्यात आले होते.

येथे काल कोविड रुग्णांची संख्या 31, 454 च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनची ही सर्वोच्च पातळी आहे. दरम्यान, झेंगझोऊमध्ये लॉकडाऊन (Zhengzhou lockdown) लागू करण्यात आलं आहे.

यामुळे अजूनही कोरोना गेला नसल्याचे दिसून येत आहे. चीनमध्ये एकाच दिवसांत अनेक प्रकरण समोर आल्याने लॉकडाऊन, प्रवास, कोरोना चाचणी आणि लसीकरण देखील वाढवत आहेत. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.

यामध्ये 15 कोटींपेक्षा जास्त मिरचीचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे

दरम्यान, यामुळे राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बीजिंगमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला चाओयांग जिल्हा जवळपास पूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर केला नाही, कारखान्यावर कारवाई करा

संपूर्ण चीनमध्ये नवीन बाधितांची संख्या सतत वाढत आहे. 1 नोव्हेंबरपासून देशभरात एकूण 2,80,000 हून अधिक संक्रमित झाले आहेत. उद्यानं, कार्यालयीन इमारती आणि शॉपिंग मॉल्स बंद करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी गावाचा मोठा निर्णय
मशरूम गर्ल! नोकरी सोडून मशरूमची शेती, आता करोडोंची उलाढाल
सर्वसामान्य लोकांना झटका! विजेच्या दरात होणार वाढ..

English Summary: Corona again China! Strict lockdown again Beijing, Zhengzhou
Published on: 24 November 2022, 12:33 IST