कोथिबीरीचा उपयोग सर्वात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकात होत असते असा कोणताही पदार्थ नाही की ज्यामधे कोथिंबिरीचा वापर केला जात नाही. पदार्थाच्या सजावटीसाठी आणि चांगल्या स्वादासाठी कोथिंबीरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच कोथिंबिरीला व्यापारी वर्गाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
भाजीपाल्याचा भाव उच्चांकी:-
नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती परंतु पाऊस पडल्यामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला पिके रानात च खराब होऊन गेली. त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे आणि भाजीपाला उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे भाजीपाल्याच भाव गगनाला भिडले आहेत.
कोथिंबिरीला सोन्याचा भाव:-
कोथिंबीर या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असते शिवाय गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कोथिंबीर चे पीक रानातच नासून गेले. त्यामुळे सध्या बाजारात कोथिंबिरीला सोन्याचा भाव मिळत आहे. सध्या नाशिक बाजारात कोथिंबीर च्या जुडीला 200 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळत आहे. कोथिंबिरीच्या भावात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागलेली आहे परंतु यातून शेतकरी वर्गाला बक्कळ नफा मिळत आहे.
हेही वाचा:-जाणून घ्या, करडई लागवडीचे तंत्र आणि व्यवस्थापन, वाचा सविस्तर.
एवढ्या रुपयांनी भाजीपाल्याच्या किमती मध्ये वाढ:-
सध्या बाजारात भाज्यांची आवक घटल्यामुळे आणि कमी उत्पन्न मिळाल्यामुळे भाजीपाल्याच्या भावात 20 ते 30 रुपयांची वाढ झालेली दिसून येते. सध्या नाशिक बाजारात अद्रक 80 रुपये किलो,लवंगी मिरची 100 किलो,शेवगा 70 रुपये किलो,ढेमस् 60 रुपये किलो,काकडी 550 रुपये कॅरेट,टोमॅटो 1100 रुपये कॅरेट,कोबी 200 रुपये कॅरेट,कोथिंबीर 200 रुपये जुडी,कारले 50 रुपये किलो,भोपळा 300 रुपये कॅरेट,फ्लॉवर 150 रुपये कॅरेट असे भाजीपाल्याचे भाव आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री:-
वाढती महागाई आणि त्यात पडणारी नेहमीच भर यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे. सध्या पालेभज्या आणि कोथिंबीर चे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
Published on: 30 September 2022, 04:59 IST