News

मुंबई: सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल, हे पाहायचे आहे असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृह येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

Updated on 01 November, 2018 7:28 AM IST


मुंबई:
सहकारातूनच सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करायचे आहे. केवळ देशातच नव्हे तर जगात महाराष्ट्राचे नाव सहकार क्षेत्रात अग्रेसर कसे होईल, हे पाहायचे आहे असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज रंगशारदा सभागृह येथे केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन पटवर्धन, आमदार जयंत पाटील, ॲड. अशिष शेलारप्रवीण दरेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, मी मार्गदर्शन नव्हे तर सहकार क्षेत्रातील मान्यवरांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. राज्यात सहकार क्षेत्राची ताकद खूप मोठी आहे. जवळपास राज्याची अर्धी लोकसंख्या विविध माध्यमातून सहकार क्षेत्राशी निगडित आहे. त्यामुळे राज्यात सहकार क्षेत्र अधिक वाढले तर आपला महाराष्ट्र अधिक समृद्ध होऊ शकतो ही भूमिका घेऊन सहकार विभाग कार्य करत आहे. आपणास महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून 5 हजार विविध सहकारी संस्थांचे बळकटीकरण करायचे आहे. त्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काम करताना चूक होते,पण जाणीवपूर्वक वारंवार चुका करू नयेत, असे सांगून श्री. देशमुख यांनी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. यात अटल पणन अभियानाचा प्रामुख्याने उल्लेख केला, तसेच राज्यात सहकार रुग्णालय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. पहिल्या टप्प्यात किमान जिल्ह्याच्या ठिकाणी हे रुग्णालय सुरू करावे, ज्याचा लाभ गोरगरिबांना होईल, त्यांचा जीव वाचेल असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात कॉपशॉप सुरु करण्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील सहकारी सोसायट्यांच्या मालकीची मैदाने गोरगरीब शेतकऱ्यांना आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजारासाठी उपलब्ध करून दिल्यास सोसायटीतील लोकांना ताजा व माफक दरात भाजीपाला व गोरगरीब शेतकऱ्यांना थेट मदत होईल, असे श्री. देशमुख म्हणाले.

सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून, त्यांनी उत्तम सोसायट्या व उत्तम कार्य करणाऱ्या संस्थांचा विशेष उल्लेख केला. राज्यातील उत्तम कार्य केलेल्या संस्थांना सर्वांनी भेट देऊन त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन केले. सहकार क्षेत्र वाढीसाठी सर्व प्रमुख संस्थांच्या संचालकांनी व सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर किमान एक संस्था काढावी संस्थेचे संस्थापक व्हावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी यावेळी केले.

विविध पुरस्कार विजेते

सहकारमहर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले. त्यांना 1 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तिपत्र देण्यात आले. विविध गटांमध्ये सहकारभूषण व सहकारनिष्ठ हे पुरस्कार देण्यात आले. त्याचे स्वरुप सहकार भूषण पुरस्कार 51 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह व सहकारनिष्ठ पुरस्कार 25 हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे.

प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था :

सहकारभूषण पुरस्कार-

  • पुणे-अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, जि.सांगली.
  • कोकण-आसुद ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आसुद, जि.रत्नागिरी.  
  • औरंगाबाद-अंधारी विकास सेवा संस्था, सिल्लोड, जि.औरंगाबाद.

सहकारनिष्ठ पुरस्कार-

  • नाशिक-शेतकरी विकास सहकारी संस्था, पिंपळगावजि.नाशिक.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका :

सहकार भूषण पुरस्कार-

  • औरंगाबाद-लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. लातूर.

सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, सहकारी दूध संघ :

सहकार भूषण पुरस्कार-

  • साखर कारखाने-श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना मर्या. भेंडा बु. नेवासा, जि.अहमदनगर.
  • सूतगिरणी-चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी मर्या, इचलकरंजी, हातकणंगले, जि.कोल्हापूर.
  • दूधसंघ-राजाराम बापू सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, इस्लामपूर, जि.सांगली.

सहकारनिष्ठ पुरस्कार-

  • दूधसंघ-पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, पुणे.

फळे भाजीपाला संस्था, खरेदी विक्री संघ, प्रक्रिया संस्था व ग्राहक संस्था :

सहकारभूषण पुरस्कार-

  • खरेदी विक्री-चंदगड तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ लि, तुर्केवाडी, चंदगड, जि.कोल्हापूर
  • प्रक्रिया-सिंदेवाडी सहकारी भातगिरणी संस्था मर्या, सिंदेवाडी, जि.चंद्रपूर.

English Summary: Cooperation will be enrich through the cooperative sector
Published on: 01 November 2018, 07:05 IST