News

ऐन महागाई च्या तडाख्यात कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या आहारातून कांदा गायबच झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात चढ उतार होताना आपल्याला दिसून येत आहे. गेल्या महिना भरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु गेल्या काही आठवड्यापासून कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

Updated on 13 November, 2021 3:08 PM IST

ऐन महागाई च्या तडाख्यात कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या आहारातून कांदा गायबच झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात चढ उतार होताना आपल्याला दिसून येत आहे. गेल्या महिना भरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली होती. परंतु गेल्या काही आठवड्यापासून कांद्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3200 भाव :

सध्याच्या स्थितीला बाजारात जुन्या कांद्याना 20 रुपये प्रति किलो ते 25 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. परंतु बाजारात कांद्याची आवक   घटल्यामुळे भावात वाढ झालेली आहे. तसेच पुढील काही दिवसात भाव कमी होतील असे सुद्धा व्यापारी वर्गाने सांगितले आहे.महाराष्ट्र राज्यातील कांद्यासाठी प्रसिध्द असलेली चाकण  बाजारपेठेत कांद्याचा भाव वाढला आहे. चाकण बाजार पेठेत कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 2 हजार ते 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.

 किरकोळ विक्रीसाठी या कांद्याची किंमत ही 32 रुपये किलो या भावाने केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या महागाई त चांगलीच भर पडणार आहे.तसेच महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अवखाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळं उत्पन्न सुद्धा निम्यावर येऊन पोहचल्यामुळे  भाव  वाढले आहेत.

सध्या च्या वेळी बाजारात कांद्याला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. तसेच जुना कांदा लवकर खराब होत असल्याने भाव कमी झालेले आहेत. तसेच पावसात भिजल्यामुळे 50 किलो कांद्याच्या पिशव्या या 20 किलो पर्यँत चांगल्या निघत आहेत. त्यामुळं रिटेल बाजारात कांदा हा दुप्पट भावाने विकला जात आहे.तसेच नव्या कांद्याबरोबर च जुन्या कांद्याना सुद्धा बाजारात योग्य मोबदला मिळत आहे. तसेच सध्या बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत महिनाभराच्या काळात कांद्याचे भाव कमी येतील असा अंदाज व्यापारी वर्गाने केला आहे.

English Summary: Consumers will still cry onions, prices fell as incomes fell
Published on: 13 November 2021, 03:08 IST