News

वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

Updated on 10 February, 2022 12:43 PM IST

वाघोली ते शिरूर दरम्यान दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी स्तुप कन्सल्टंन्सी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून येत्या आठवडाभरात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. गतवर्षी २२ जून रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वार्षिक आराखड्यात या कामासाठी रु. ७२०० कोटी मंजूर केले होते.तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी २० कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन स्तुप कन्सल्टंन्सीची नियुक्ती करण्यात आली.

वाघोली ते शिरूर रस्त्यासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त झाल्याने वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे. त्यामुळे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगत दोघांचेही आभार व्यक्त केले आहे. 

English Summary: Consultant appointed for 18-lane road work including Wagholi-Shirur two-lane bridge
Published on: 10 February 2022, 12:43 IST