News

खरीप हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच लगबग सुरु झाली असून प्रत्येकजण बियाणे आणि खताचे नियोजन करत आहे. मात्र सेवा केंद्र शेतकऱ्यांची फसवणूक करून अधिक किमतीत बियाणे विकतात तर कधी बोगस बियाणे देतात.

Updated on 04 June, 2022 11:02 AM IST

खरीप हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचीच लगबग सुरु झाली असून प्रत्येकजण बियाणे आणि खताचे नियोजन करत आहे. मात्र सेवा केंद्र शेतकऱ्यांची फसवणूक करून अधिक किमतीत बियाणे विकतात तर कधी बोगस बियाणे देतात. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बराच परिणाम होतो. दरम्यान, हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात होते.

यासाठी भरारी पथक देखील तैनात करण्यात आली होती. खत, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची बरीच फसवणूक केली जाते. शेतकऱ्यांनी ही फसवणूक टाळण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेच आहे. आता शेतकरी सुद्धा फसवणुकीपासून वाचू शकणार आहेत. तुम्ही ज्या बाजारपेठेत खताची खरेदी करता तिथे असणाऱ्या कृषी सेवा केंद्रात रोज खताचा साठा किती आहे याची सगळी माहिती तुम्हाला जाणून घेता येणार आहे. मोबाईलवर ही माहिती उपलबद्ध होणार असून आता विक्रेत्यांच्या मनमानीवर आळा बसणार आहे.


खताची माहिती देणारी वेबसाईट
भारत सरकारने आता खत मंत्रालयाच्या माध्यमातून देश तसेच राज्यातील खताच्या साठ्याविषयी सगळी माहिती देणारी वेबसाईट तयार केली आहे. त्यानुसार यात खताचा पुरवठा, स्टॉक तसेच इतर सर्वकाही माहिती दिलेली आहे. कोणत्या दुकानात किती साठा आहे? राज्यात एकंदरीत किती खताची आवश्यकता आहे? शिवाय खरिपात कोणत्या पिकासाठी किती खाताचे नियोजन करण्यात आले आहे हे देखील वेबसाईटवर पाहता येणं शक्य आहे.

धक्कादायक: ऊसाचे बिल मागायला गेलेल्या शेतकऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धक्काबुक्की

वेबसाईटबद्दल
fert.nic.in ही खत मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट आहे. यावर गेल्यास तुमच्यासमोर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट येईल. वेबसाईटच्या उजवीकडेच 'Fertilizer Dashboard' असा ऑपशन असेल. यावर क्लिक करावे. त्यानंतर e-Urvarak नावाने एक पेज ओपन होईल.या पेजवर देशात किती विक्रेते आहेत.

तसेच 1 एप्रिलपासून 29 मे पर्यंत किती खताची विक्री झाली याबाबतचे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घेता येईल. याच पेजवर 'Farmer Corner' या पर्यायावर क्लिक केले की, यामध्ये Retailer Opening Stock As On Today यावर खताच्या दुकानात किती स्टॉक उपलब्ध आहे हे समजेल. त्यासाठी तुमचा जिल्हा, दुकानचा Retailer ID असेल तर किंवा मग त्या संबंधित Agency Name टाकावे. तसेच दुकानाचे नाव टाकले तरी तुम्हाला माहिती मिळू शकेल.

आणि जर समजा तुम्हाला कोणतीच माहिती नसेल तर All या पर्यायावर क्लिक करून Show पर्याय निवडावा. यातून तुम्हाला जिल्ह्यातल्या कोणत्या दुकानात किती साठा आहे याची माहिती मिळेल. सगळ्यात शेवटी Select Retailer या ऑपशनवर क्लिक करुन संबंधित दुकानाचे नाव निवडून Show पर्यायवर क्लिक
केलं तर त्या दिवासातला साठा किती आहे याची माहिती मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
शेतकरी संकटात; तब्ब्ल २ हजार कोंबड्यांचा मृत्यू
कारखानदारांनो राजू शेट्टींनी सुचवलेला उपाय ऐका; ऊस गाळपाबाबत दिला महत्वाचा सल्ला

English Summary: Consolation decision of Modi government regarding sale of fertilizers; Farmers will benefit
Published on: 04 June 2022, 11:02 IST