News

नुकताच कर्नाटकमध्ये विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये काँग्रेसला स्पष्ठ बहुमत मिळाले आहे. कर्नाटकचा विधानसभेचा निकाल ठरल्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती.

Updated on 17 May, 2023 3:31 PM IST

नुकताच कर्नाटकमध्ये विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये काँग्रेसला स्पष्ठ बहुमत मिळाले आहे. कर्नाटकचा विधानसभेचा निकाल ठरल्यानंतर कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू होती.

यामध्ये डीके शिवकुमार की सिद्धरामैया ही दोन नावे आघाडीवर होती. अखेर आता या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा शपथविधी होणार आहे.

तसेच डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच डीके शिवकुमार यांना महत्त्वाच्या मंत्रालयांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे.

KJ Chaupal मध्ये भारत आणि ब्राझीलमधील सहकार्य आणि सांस्कृतिक संबंधावर चर्चा

उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे. आता राहुल डीके शिवकुमार यांची भेट घेणार आहेत.

यंदा दुष्काळ पडणार? हवामान खात्याने दिला इशारा..

यामुळे आता कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला आहे. लवकरच मंत्रिमंडळ देखील होणार आहे. यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी आमदार आग्रही आहेत.

ऊस बिलासाठी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवला, हर्षवर्धन पाटलांच करायचं काय, खाली मुंड वर पाय, शेतकऱ्यांच्या घोषणा
तेलंगणामध्ये सरकार करणार हमीभावाने ज्वारीची खरेदी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
शेतकऱ्याने आंब्याला दिले शरद पवारांच नाव! कारणही सांगितलं...

English Summary: Congress decided! Finally, the Chief Minister's name is sealed in Karnataka...
Published on: 17 May 2023, 03:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)