नागार्जुन वनौषधी उद्यान, डॉ. प.दे.कृ.वि, अकोला तर्फे अनुसूचित जमाती उपयोजना (TSP) अंतर्गत मौजे माखला ता. चिखलदरा जिल्हा अमरावती येथे औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावर दि. २७/३/२०२१ रोजी शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन पतके, प्रमुख, नागार्जुन वनौषधी उद्यान, डॉ. प.दे.कृ.वि, अकोला यांचे हस्ते झाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री अमित देशमुख डॉ. मनीष वाकोडे, सहा. प्राध्यापक, उपस्थित होते श्री अमित देशमुख, सहा. प्राध्यापक, डॉ. मनीष वाकोडे, सहा. प्राध्यापक यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
वनौषधीला बाजारपेठेमध्ये जास्त भाव मिळण्याकरिता वनौषधीची प्रतवारी कशी करावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. मनीष वाकोडे, सहा. प्राध्यापक यांनी औषधी वनस्पतीचे महत्व, प्रतिकार क्षमता वाढविण्या करिता औषधी वनस्पतीचे उपयोग या विषयी मार्गदर्शन केले तर श्री अमित देशमुख, सहा. प्राध्यापक यांनी औषधी वनस्पती अश्वगंधा पिकाची वाढत्या मागणीकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले व या वाढत्या मागणीचा फायदा घेवून आर्थिक फायदा करून घेण्याचे शेतकर्यांना सांगितले.
पारंपारिक पिकांसोबतच अपारंपरिक पिकांचे वाढते महत्व लक्षात घेता शेतकर्यांनी विद्यापीठासोबत सलंग्न राहून विद्यापीठाच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहित घ्यावी व नफ्याची शेती कशी करता येईल ह्या बद्दल श्री अमित देशमुख यांनी उपस्थित शेतकर्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मनीष वाकोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाला ३० शेतकरी उपस्थित होते. उपस्थित २५ शेतकर्यांना मान्यवरांच्या हस्ते ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.
माखला येथील शेतकर्यांनी उत्स्फूर्तरित्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री नारायण वाकोडे, श्री प्रवीण जामकर, श्री राहुल राठोड, श्री हिरामण पुण्या बेठे, श्री मनिराम बाला धिकार यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा कार्यक्रमामुळे आम्हाला नवीन पिकांचे जसे औषधी वनस्पतीचे मार्गदर्शन मिळाल्याने ह्या माहितीचा आम्ही निश्चित उपयोग करू असे मनोगत उपस्थित शेतकर्यांनी व्यक्त केले.
Published on: 09 April 2022, 09:31 IST