News

गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा, अशा सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. बिगर गोवंशापासून तयार होणाऱ्या दुधाच्या विक्रीबाबत ग्राहकांना माहिती देताना सध्या देशभर वेगवेगळी माहिती दिली जात आहे.

Updated on 18 January, 2021 11:26 AM IST

गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा, अशा सुचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. बिगर गोवंशापासून तयार होणाऱ्या दुधाच्या विक्रीबाबत ग्राहकांना माहिती देताना सध्या देशभर वेगवेगळी माहिती दिली जात आहे.

यातून गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाच्या दर्जाला कमी लेखणारी माहिती दिली जात  असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम तयार होतो. त्यामुळे देशाच्या  मत्स्य, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्रालयाने  चिंता व्यक्त केली आहे.सुत्रांच्या म्हणण्यानुसार, गाय, म्हैस अशा गोवंशाच्या दुधापासून मिळणाऱ्या पोषणमूल्यांची उपयुक्तता मोठी आहे. वयोवृद्ध तरुण तसेच तरुणांसाठी पूर्णान्न म्हणून या दुधाचे शेकडो वर्षांपासून सिद्ध झालेले आहेत. अशा स्थितीत या दुधाचे महत्व कमी करणारी माहिती देशभर पसरवली जात आहे.

 

ही बाब केंद्रीय पशुसंवर्धन सचिव अतुल चतुर्वेदी यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेला कळवली आहे.आयसीएआर महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले आहे, की कृषी मंत्रालआने सर्व कृषी विद्यापीठे आणि डेअरी तंत्रज्ञान महाविद्यालयांना दोन्ही दुधांबाबत अभ्यास करण्यास सूचित करावे.याशिवाय गोवंशाच्या दुधाबाबत सुरु असलेल्या अपप्रचाराला तोंड देणारी योग्य  माहिती देखील ग्राहकांपर्यंत न्यावी. त्यासाठी  देशभर विविध माध्यमांमधून माहिती दिली जावी.

English Summary: Conduct scientific study on non-dairy milk - Central Government
Published on: 18 January 2021, 11:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)