News

सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे रशिया व युक्रेन यांच्या युद्धाची. जे की दिवसेंदिवस हे युद्ध भडकतच चालले असल्यामुळे याचे हळूहळू परिणाम जाणवायला लागले आहेत. काळाच्या ओघात देश प्रगत तंत्रज्ञानाकडे ओळत आहेत पण अशामधे ग्लोबल व्हिलेज झाले असल्याने सर्व देशांना युद्धाची झळ बसत आहे. आता पहिलाच या युद्धाचा आयात निर्यातीला फटका बसलेला आहे. जे की या फटक्यामुळे जगातील शेतकरी वर्ग तसेच व्यापारी वर्ग घाबरले आहेत. या चालू असलेल्या युद्धामुळे अनेक प्रकारच्या अफवा सुद्धा उठत आहेत. अशीच एक अफवा नाशिक जिल्ह्यात उठली असल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेमध्ये भर पडलेली आहे. परंतु द्राक्षे संघाने या अफवांचे त्याच वेळी निर्सन केले आहे आणि खरे चित्र समोर आले आहे.

Updated on 02 March, 2022 6:39 PM IST

द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण :-

राज्यातून रशिया ला प्रत्येक वर्षी ३० ते ३५ हजार मेट्रिक टन द्राक्षेची निर्यात केली जाते. जे की या निर्यातीमध्ये नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांचा महत्वाचा वाटा आहे. सध्या द्राक्षे निर्यातीचा हंगाम सुरू आहे आणि रशिया व युक्रेन देशात युद्ध सुरू झाले. यामुळे नाशिक जे की द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखले जाते तेथील उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एवढेच नाही तर रशिया व युक्रेन चे युद्ध सुरू असल्याने याचा परिणाम निर्यातीवर होत आहे आणि द्राक्षचे दर ही कोसळले आहेत अशी अफवा व्यापाऱ्यांनी उठवली असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. रशिया व युक्रेन चा युद्धाचा फायदा उठवत व्यापारी वर्ग अशा प्रकारच्या अनेक अफवा उठवत आहेत जे की महाराष्ट्र राज्याच्या द्राक्षे संघाने लगेच या गोष्टींचा खुलासा केला.

द्राक्ष बागायतदार यांनी मिटवली शेतकऱ्यांची चिंता :-

रशिया युक्रेन मध्ये चालू असलेल्या युद्धाचा कोणताही परिणाम द्राक्ष निर्यातीवर होणार नाही अशी माहिती नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक रामनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, जे की द्राक्षे उत्पादकांनी आजिबात घाबरून जाऊ नये असे त्यांनी सांगितले आहे. जरी रशिया व युक्रेन मध्ये युद्ध सुरू असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वपणे व्यवस्थितरित्या निर्यात व्यवस्था चालू आहे त्यामुळे या अफवेला घाबरून न जाता व्यापारी वर्गावर विश्वास ठेवू नये.

युद्धाच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून फसवणूकीचा प्रकार :-

द्राक्षे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याना रशिया व युक्रेन या युद्धाची भीती घालून फसवण्याचा प्रयत्न केला आहे जे की कमी किमतीत द्राक्षे घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे नाशिक मध्ये ही अफवा उठवण्यात आली की रशिया व युक्रेन मध्ये युद्ध सुरू असल्याने निर्यात थांबवली आहे आणि बाजारपेठेत द्राक्षाचे भाव सुद्धा कोसळले आहे. मात्र द्राक्ष उत्पादक संघाने यावर तात्काळ ऍक्शन घेतली आणि चिंतेचे निर्सन केले.

English Summary: Concern grows among grape growers in Nashik! Is Russia-Ukraine war really affecting exports?
Published on: 02 March 2022, 06:39 IST