राज्याच्या कृषी विभागाचा लोगो तयार करण्यासाठी स्पर्धा; विजेत्यास 25 हजाराचे पारितोषिक

Monday, 08 July 2019 07:57 AM


बीड:
कृषी विभागाचा लोगो प्रचलित असून कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येतो. सध्या कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने प्रचलित लोगोमध्ये बदल करुन नव्याने लोगो करण्याचे प्रस्तावित आहे.

जुन्या लोगोमध्ये सुधारणा करुन डीटीपी डिझाईनचे सॉफ्ट व हार्ड (रंगीत) कॉपी कृषी माहिती विभाग, कृषी भवन 2 रा मजला, शिवाजीनगर, पुणे-5 येथे समक्ष किंवा ddinfor@gmail.com या ईमेलवर दि. 31 जुलै 2019 पर्यंत पाठविण्यात यावा. तसेच ब्रिदवाक्यही सूचविण्यात यावे. सोबत सद्या वापरण्यात येत असलेला लोगो देण्यात येत आहे. उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्या व्यक्ती, संस्था, फर्म्स यांना 25 हजार रुपयाचे पारितोषिक देऊन विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. लोगो वापरण्याचे स्वामित्व, हक्क कृषी विभागाकडे राहतील यांची नोंद घ्यावी. 

अधिक माहितीसाठी श्री. रामकृष्ण जगताप, कृषी उपसंचालक (माहिती), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-5 येथे दूरध्वनी क्रमांक 020-25537865 आणि मोबाईल क्रमांक 9823356835 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पुणे, कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
 

Agriculture Department Governmant of Maharashtara Climate Change महाराष्ट्र शासन कृषी विभाग Agriculture Department logo कृषी विभाग लोगो

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.